चोरीसाठी आपली बसच्या कंडक्टर व चालकांनी मोबाईलवर व्हॉट्सअॅप ‘कंडक्टर सेटअप ग्रुप’ बनविला आहे. या माध्यमातून आपली बसच्या तिकीट चेकर्सच्या लोकेशनची माहिती एकमेकांना देऊन तिकीट चोरी केली जाते. यामुळे महापालिकेला दररोज ४ ते ५ लाखांचा फटका बसत आहे. ...
परिवहन सभापती बाल्या बोरकर यांनी पहाटे ५ वाजताच्या सुमारास तीन बस डेपोत ३२६ बसची तपासणी केली असता, अस्वच्छता तसेच काही बसेस नादुरुस्त आढळून आल्याने तीन बस ऑपरेटरला प्रत्येकी ५ लाख असा १५ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. ...
आपली बसचा तोटा कमी करण्यासाठी तिकिटांचा गैरव्यवहार रोखणे आवश्यक आहे. यासाठी चेकर्सची नियुक्ती करण्यात आलेली आहे.परंतु चेकर्सलाही धमक्या येतात. याचा महापालिकेच्या उत्पन्नावर परिणाम होत असल्याने चेकर्सवर नजर ठेवली जाणार आहे. ...
महापालिकेच्या आपली बस सेवेतील कंडक्टर व चालकांना नियमानुसार वेतन मिळणार आहे. यामुळे महापालिकेच्या तिजोरीवर दर महिन्याला एक कोटींचा बोजा वाढणार आहे. ...