शिवसेनेतून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणारे प्रवीण दरेकर Pravin Darekar हे सुरुवातीला राज ठाकरे यांच्यासोबत भारतीय विद्यार्थी सेनेमध्ये सक्रीय होते. शिवसेनेतील आक्रमक आणि अभ्यासू नेते म्हणून त्यांची ओळख होती. राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (मनसे) स्थापना केली. दरेकरही राज ठाकरेंसोबत आले. मनसेच्या तिकीटावर मागाठणे मतदारसंघातून त्यांनी निवडणूकही जिंकली. २००९ ते १४ या कालावधीत ते मनसेचे आमदार होते. २०१४मध्ये त्यांचा पराभव झाला. त्यांनी मनसेतून भाजपमध्ये प्रवेश केला. ते मागाठणेमधून तिकीटासाठी आग्रही होते. पण हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्यानं त्यांना उमेदवारी मिळू शकली नाही. दरेकर यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आले. दरेकर हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी मानले जातात. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी त्यांची निवड झाली आहे. Read More
Maharashtra Politics : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. पहिल्याच दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकाच लिफ्टमधून प्रवास केल्याचे व्हिडीओ, आणि फोटो व्हायरल झाले आहेत. ...
Amol Mitkari : महायुतीमधील नेत्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचे दिसत आहे. अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी आता पुन्हा प्रवीण दरेकर आणि संजय शिरसाट यांच्यावर टीका केली. ...
आरेच्या रहिवाश्यांना महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून मूलभूत सुविधा उपलब्ध करून न्याय मिळवून द्यावा अशी विनंती मुंबई भाजपाचे उपाध्यक्ष प्रवीण मर्गज यांनी विधानपरिषदेतील भाजपाचे गटनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. सदर प्रकरणी त्यांनी येथील २००० न ...
Maharashtra Politics : लोकसभेच्या निवडणुका संपल्या असून देशात एनडीए'ने सरकार स्थापन केले आहे, तर दुसरीकडे आता महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. ...
loksabha Election Result - केंद्रीय मंत्रिमंडळात शिवसेनेला कॅबिनेट मंत्रिपदाऐवजी राज्यमंत्री पद दिल्याने शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. त्यावरून आता भाजपा आमदार दरेकरांनी प्रत्युत्तर दिले आहे. ...