शिवसेनेतून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणारे प्रवीण दरेकर Pravin Darekar हे सुरुवातीला राज ठाकरे यांच्यासोबत भारतीय विद्यार्थी सेनेमध्ये सक्रीय होते. शिवसेनेतील आक्रमक आणि अभ्यासू नेते म्हणून त्यांची ओळख होती. राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (मनसे) स्थापना केली. दरेकरही राज ठाकरेंसोबत आले. मनसेच्या तिकीटावर मागाठणे मतदारसंघातून त्यांनी निवडणूकही जिंकली. २००९ ते १४ या कालावधीत ते मनसेचे आमदार होते. २०१४मध्ये त्यांचा पराभव झाला. त्यांनी मनसेतून भाजपमध्ये प्रवेश केला. ते मागाठणेमधून तिकीटासाठी आग्रही होते. पण हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्यानं त्यांना उमेदवारी मिळू शकली नाही. दरेकर यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आले. दरेकर हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी मानले जातात. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी त्यांची निवड झाली आहे. Read More
Remdesivir Injection: विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि प्रदेश भाजपचे उपाध्यक्ष आ. प्रसाद लाड यांनी सोमवारी दमणमधील ब्रुक फार्मा कंपनीच्या व्यवस्थापनाशी चर्चा केली. ...
Remdesivir : महाराष्ट्रासाठी भाजपकडून ५० हजार रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करून देण्याची घोषणा विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली आहे. ...
BJP Pravin Darekar Slams Nawab Malik And Rohit Pawar Over Remdesivir : नवाब मलिक यांच्या आरोपांवर आता भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ...
pravin darekar : एकीकडे कोरोना संकट काळात जनतेसाठी भूमिका न घेता मौन पाळलं जात आहे आणि दुसरीकडे मात्र अनिल देशमुख यांना सरकार पाठबळ देत आहे, अशी टीका प्रविण दरेकर यांनी केली. ...
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या वसुलीचे आरोप लावले होते, या आरोपावरून अखेर गृहमंत्री अनिल देशमुखांना त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे ...