शिवसेनेतून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणारे प्रवीण दरेकर Pravin Darekar हे सुरुवातीला राज ठाकरे यांच्यासोबत भारतीय विद्यार्थी सेनेमध्ये सक्रीय होते. शिवसेनेतील आक्रमक आणि अभ्यासू नेते म्हणून त्यांची ओळख होती. राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (मनसे) स्थापना केली. दरेकरही राज ठाकरेंसोबत आले. मनसेच्या तिकीटावर मागाठणे मतदारसंघातून त्यांनी निवडणूकही जिंकली. २००९ ते १४ या कालावधीत ते मनसेचे आमदार होते. २०१४मध्ये त्यांचा पराभव झाला. त्यांनी मनसेतून भाजपमध्ये प्रवेश केला. ते मागाठणेमधून तिकीटासाठी आग्रही होते. पण हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्यानं त्यांना उमेदवारी मिळू शकली नाही. दरेकर यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आले. दरेकर हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी मानले जातात. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी त्यांची निवड झाली आहे. Read More
भाजपचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे. ...
संजय राऊत यांनी (Sanjay Raut) आपल्या रोखठोक सदरातून केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. याला भाजपने प्रत्युत्तर दिले आहे. ...
BJP Pravin Darekar Slams Thackeray Government Over Virar Hospital Fire : प्रविण दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. ...
Remdisivir Crisis, Politics Between BJP And Thackeray Government: मंत्री नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा भाजपावर गंभीर आरोप केले आहेत. रेमडेसिवीरचा साठा भाजपाच्या माजी आमदाराच्या हॉटेलवर ठेवण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. ...