शिवसेनेतून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणारे प्रवीण दरेकर Pravin Darekar हे सुरुवातीला राज ठाकरे यांच्यासोबत भारतीय विद्यार्थी सेनेमध्ये सक्रीय होते. शिवसेनेतील आक्रमक आणि अभ्यासू नेते म्हणून त्यांची ओळख होती. राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (मनसे) स्थापना केली. दरेकरही राज ठाकरेंसोबत आले. मनसेच्या तिकीटावर मागाठणे मतदारसंघातून त्यांनी निवडणूकही जिंकली. २००९ ते १४ या कालावधीत ते मनसेचे आमदार होते. २०१४मध्ये त्यांचा पराभव झाला. त्यांनी मनसेतून भाजपमध्ये प्रवेश केला. ते मागाठणेमधून तिकीटासाठी आग्रही होते. पण हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्यानं त्यांना उमेदवारी मिळू शकली नाही. दरेकर यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आले. दरेकर हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी मानले जातात. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी त्यांची निवड झाली आहे. Read More
भाजपचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या अडचणी आता वाढण्याची शक्यता आहे.. कारण प्रवीण दरेकर यांच्या विरोधात आता गुन्हा दाखल झालाय... सिंहगड रोड पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीनंतर प्रवीण दरेकर यांच्या विरोधात कलम ५०९ अंतर्गत गु ...
शिरुर येथे १३ सप्टेंबर रोजी आदयक्रांतीकारक उमाजी नाईक यांच्या २३० व्या जयंती निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमातील भाषणामध्ये प्रविण दरेकर यांनी जाणून बूजून राष्ट्रवादी काँग्रेसबाबत वादग्रस्त व्यक्तव्य केले होते. ...
BJP Pravin Darekar And NCP : भिवंडीत राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा स्वाती कांबळे यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी प्रवीण दरेकरांच्या बॅनरला जोडे मारो आंदोलन करून आपला संताप व्यक्त केला. ...
सुप्रसिद्ध लोक कलावंत सुरेखा पुणेकर उद्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावर सुरेखा पुणेकर यांनी आक्रमक भूमिका मांडलीय. राष्ट्रवादी काँग्रेस हा रंगलेल्या गा ...
Vasai Virar BJP And NCP News : रूपाली चाकणकर यांनी दिलेल्या आदेशानुसार आम्ही वसई विरारमध्ये दरेकर यांच्या फोटोला जोडो मारो आंदोलन करून या वक्तव्याचा निषेध करत आहोत अशा शब्दात त्यांनी दरेकर यांच्यावर निशाणा साधला. ...