शिवसेनेतून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणारे प्रवीण दरेकर Pravin Darekar हे सुरुवातीला राज ठाकरे यांच्यासोबत भारतीय विद्यार्थी सेनेमध्ये सक्रीय होते. शिवसेनेतील आक्रमक आणि अभ्यासू नेते म्हणून त्यांची ओळख होती. राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (मनसे) स्थापना केली. दरेकरही राज ठाकरेंसोबत आले. मनसेच्या तिकीटावर मागाठणे मतदारसंघातून त्यांनी निवडणूकही जिंकली. २००९ ते १४ या कालावधीत ते मनसेचे आमदार होते. २०१४मध्ये त्यांचा पराभव झाला. त्यांनी मनसेतून भाजपमध्ये प्रवेश केला. ते मागाठणेमधून तिकीटासाठी आग्रही होते. पण हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्यानं त्यांना उमेदवारी मिळू शकली नाही. दरेकर यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आले. दरेकर हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी मानले जातात. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी त्यांची निवड झाली आहे. Read More
Vasai Virar BJP And NCP News : रूपाली चाकणकर यांनी दिलेल्या आदेशानुसार आम्ही वसई विरारमध्ये दरेकर यांच्या फोटोला जोडो मारो आंदोलन करून या वक्तव्याचा निषेध करत आहोत अशा शब्दात त्यांनी दरेकर यांच्यावर निशाणा साधला. ...
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा ‘रंगलेल्या गालाचा’ मुका घेणारा पक्ष आहे, अशी टीका प्रवीण दरेकरांनी केली. लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातम्या आल्या आणि त्यावरच दरेकरांना टीका करायची असेल... पण, त्यावर टी ...
भाजपचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करताना जीभ घसरली. त्यावरुन आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. ...
चाकणकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये, त्यांनी प्रवीण दरेकर यांना स्पष्ट इशारा दिलाय. दरेकर यांनी पुण्यात शिरूर येथील क्रांतीकारक उमाजी नाईक जयंती कार्यक्रमात बोलताना वादग्रस्त टिपण्णी केली होती. ...