शिवसेनेतून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणारे प्रवीण दरेकर Pravin Darekar हे सुरुवातीला राज ठाकरे यांच्यासोबत भारतीय विद्यार्थी सेनेमध्ये सक्रीय होते. शिवसेनेतील आक्रमक आणि अभ्यासू नेते म्हणून त्यांची ओळख होती. राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (मनसे) स्थापना केली. दरेकरही राज ठाकरेंसोबत आले. मनसेच्या तिकीटावर मागाठणे मतदारसंघातून त्यांनी निवडणूकही जिंकली. २००९ ते १४ या कालावधीत ते मनसेचे आमदार होते. २०१४मध्ये त्यांचा पराभव झाला. त्यांनी मनसेतून भाजपमध्ये प्रवेश केला. ते मागाठणेमधून तिकीटासाठी आग्रही होते. पण हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्यानं त्यांना उमेदवारी मिळू शकली नाही. दरेकर यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आले. दरेकर हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी मानले जातात. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी त्यांची निवड झाली आहे. Read More
Praveen Darekar: भाजप नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना माता रमाबाई आंबेडकर पोलिसांनी मुंबई बँक गैरव्यवहार प्रकरणात पुन्हा समन्स बजावत ११ एप्रिलला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले. ...
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानावर हल्ला करणारे एसटी कर्मचारी नव्हते. यामागे कोणती अदृश्य शक्ती आहे याची कल्पना सर्वांनाच आहे. गृहमंत्र्यांची याची पाळंमुळं शोधून काढावीत अशी मागणी करत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज भाजपा ...
केवळ सत्तेसाठी बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसैनिकांना पंढरपूरमध्ये राष्ट्रवादीचा झेंडा घ्यावा लागला. तर आता कोल्हापूरमध्ये काँग्रेसचा झेंडा घ्यावा लागला याचे दुख आहे. ...
वेळेअभावी दरेकरांच्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणी हायकोर्टात होऊ न शकल्याने पुढील आदेश येईपर्यंत दरेकरांना अटक न करण्याचे निर्देश कोर्टाने पोलिसांना दिले. ...