राज ठाकरेंची भूमिका भाजपाच्या हिंदुत्वाच्या भूमिकेला बळकटी देणारी; युतीबद्दलही दरेकरांनी सांगितलं!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2022 06:24 PM2022-05-06T18:24:22+5:302022-05-06T18:35:59+5:30

भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनी मनसेबाबतच्या युतीबद्दल भाष्य केलं आहे.

BJP leader Praveen Darekar has commented on the alliance with MNS. | राज ठाकरेंची भूमिका भाजपाच्या हिंदुत्वाच्या भूमिकेला बळकटी देणारी; युतीबद्दलही दरेकरांनी सांगितलं!

राज ठाकरेंची भूमिका भाजपाच्या हिंदुत्वाच्या भूमिकेला बळकटी देणारी; युतीबद्दलही दरेकरांनी सांगितलं!

Next

मुंबई- सध्या राज्यात मिशिदीवरील भोंग उतरवण्याचा विषय चांगलाचं गाजला आहे. मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी यासाठी आक्रमक भूमिका घेतली असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, राज ठाकरेंच हिंदुत्व प्रेम अचानक कसं काय इतकं समोर येत आहे, असा सवालही केला जात आहे. अशा काही घडामोडींमुळे मनसे आणि भाजपाच्या युतीच्या चर्चेलाही रंग चढला आहे.

मनसे आणि भाजपाच्या युतीबाबत दोन्ही पक्षातील नेते सध्यातरी बोलत नसले, तरी राज्यभरात मात्र दोघांच्या युतीबाबत अनेक चर्चा होत आहे. याचदरम्यान भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनी मनसेबाबतच्या युतीबद्दल भाष्य केलं आहे. भाजपा-मनसे युती संदर्भात सध्या तरी कुठलीही चर्चा किंवा कुठल्याही बाजूने प्रस्ताव आलेला नाही, त्यामुळे यासंदर्भात सध्या भाष्य करणे योग्य ठरणार नाही, असं प्रवीण दरेकर म्हणाले. 

प्रवीण दरेकरांनी ट्विटरवर व्हिडिओ शेअर करुन आपली भूमिका मांडली. भाजपाच्या हिंदुत्वाच्या भूमिकेला बळकटी देणारी, अधोरेखित करणारी भूमिका राज ठाकरे यांची आहे, अशं प्रवीण दरेकर म्हणाले. तसेच राज ठाकरेंच्या या भूमिकेचे भाजपा किंवा देशातील हिंदुत्ववादी संघटना नक्कीच स्वागतच करतील, असंही प्रवीण दरेकर म्हणाले. 

दरम्यान, राज ठाकरेंच्या मनसे बरोबर भाजपची युती करणं हे भाजपला परवडणार नाही. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सबका साथ सबका विकास, सबका विश्वास ही भूमिका मांडलीय, त्या भूमिकेला तडा जाऊ शकतो, असे मत केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मांडलं आहे.  मनसेला सोबत घेण्याचा भाजपने विचार करू नये. मी सोबत असताना भाजपला मनसेची गरज नाही, महाराष्ट्र मध्ये भाजप आणि आरपीआय सोबत  येत सत्ता आणूया आणि पुन्हा देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्याची आमची भूमिका आहे असे आठवले म्हणाले.

Web Title: BJP leader Praveen Darekar has commented on the alliance with MNS.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.