प्रकाश जावडेकर हे भारतीय जनता पक्षामधील राजकारणी, राज्यसभा सदस्य व मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. जावडेकरांचा जन्म पुण्यामध्ये झाला. त्यांचे वडील अखिल भारतीय हिंदू महासभेचे वरिष्ठ सदस्य होते. तरुण वयातच जावडेकर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सदस्य झाले. 1971 ते 1981 दरम्यान त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरी केली; 1990 ते 2002दरम्यान जावडेकर महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य होते. 2008 साली जावडेकर महाराष्ट्रातून आणि 2014 मध्ये मध्य प्रदेश राज्यामधून राज्यसभेवर निवडून गेले. प्रकाश जावडेकर हे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री आहेत. Read More
म्हादई पाणीप्रश्नी गोव्याला विश्वासात न घेता केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या खात्याने कर्नाटकला धरण बांधण्यासाठी परवानगी देऊन टाकल्याने मुख्यमंत्री प्रमोद सावंत संतप्त झाले. ...
डॉ.मनमोहन सिंह यांच्याच कार्यकाळातील भूमिकांमुळे बँकांची व्यवस्था कोलमडली, असा आरोप केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला. नागपुरात शुक्रवारी पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते. ...