डाळिंब हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी कोरडवाहू फळपिक आहे. प्रामुख्याने हे पिक महाराष्ट्रातील कोरडवाहू भागात घेतले जाते. भगवा ही जात खूप प्रसिद्ध आहे. सोलापूर जिल्हा डाळिंबासाठी प्रसिद्ध आहे. बऱ्यापैकी डाळिंब निर्यातही केली जाते. Read More
दुष्काळात पाण्याअभावी शेतातील मोसंबीची बाग जळून नष्ट झाली. अशा स्थितीत हार न मारता शेतकरी दाम्पत्याने सहा एकरात डाळींबाची बाग फुलवली. विशेषतः उत्पादित माल सलग तीन वर्षे युरोपाच्या बाजारपेठेत विक्री करून नफाही मिळवला आहे. भगवान अवघड यांची ही डाळिंब यश ...
बनपुरी येथील शेतकरी दीपक बापूसाहेब देशमुख हे गेल्या सात वर्षांपासून डाळिंब पीक घेतात. प्रत्येक वर्षी ते डाळिंबात चांगल्या पद्धतीने उत्पादन काढतात. मात्र या वर्षीची सर्वोत्कृष्ट दर्जाच्या डाळिंबाला रशियामध्ये सर्वाधिक मागणी आहे. ...
अमेरिकेतील कॅलिफोर्निया डाळिंबाच्या जातीपेक्षा भारतीय डाळिंबाच्या जातीला जास्त मागणी आहे. त्यामुळेच अनेक वर्षांच्या प्रयत्नानंतर भारतीय डाळिंब अमेकरिकेत दाखल झाले आहेत. ...
आटपाडी तालुका म्हटलं की दुष्काळ, पिण्याच्या पाण्याची होत असणारी आबळ ठरलेली आहे. पण याच दुष्काळी परिस्थितीवर मात करून शेटफळे (ता. आटपाडी) येथील तरुण शेतकरी रुपेश गायकवाड यांनी ५ एकर ३० गुंठ्यात विक्रमी ४३ लाखांचे उत्पन्न घेतले आहे. ...
भारत हा जगातील सर्वात मोठा डाळिंब उत्पादक देश आहे. भारतामध्ये डाळिंब हे पीक, आंबिया बहार, मृग बहार व हस्त बहार या तिनही बहारात घेतले जाते. थोडक्यात भारतामध्ये डाळिंब पीक वर्षभर घेतले जाते. ...
महाराष्ट्रातील बारामती मधील पेरूची निर्यात आता संयुक्त अरब अमिरातीला केली जाणार असून बारामती मधील केळ्यांची निर्यात नेदरलँड, सौदी अरेबिया आणि रशियाला होणार आहे. ...
पंढरपूर पाण्याचं, मंगूड दाण्याचं, सांगुलं सोन्याचं अशी एक म्हण माण परिसरात प्रसिद्ध आहे. कालांतराने या म्हणीमध्ये बदल झाला, पंढरपूर पाण्याचं, मंगुड दाण्याचंच राहिलं व सांगूल सोन्यासारख्या डाळिंबाचं झालं. डाळिंबातील आर्थिक सुबत्तेमुळे सांगोला तालुक्या ...