चोरीच्या आरोपात पोलिसांनी ताब्यात घेतलेली शीलाबाई मदनलाल कुंभार (वय ६०) नामक आरोपी महिला गुरुवारी सकाळी पोलीस ठाण्यातून पळून गेली. यामुळे पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. ...
‘संबंधा’ला घरच्यांचा तीव्र विरोध झाल्यामुळे दिल्लीतील दोन आणि आग्रा येथील एक अशा तीन तरुणी नागपुरात पळून आल्या. त्यांना सदर पोलिसांनी मोहननगरातून ताब्यात घेतले. प्राथमिक तपासानंतर पोलिसांनी त्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले. ...
बसने प्रवासाला निघाल्यावर प्रत्येकाला कंडक्टर वाजवितो त्या घंटीचा आवाज ऐकू येतो. वाहकाने वाजविलेल्या घंटीतील कोडच्या आधारावर चालक आपल्याला पुढे जायचे की काय याचा निर्णय घेतो. बसमध्ये असामाजिक तत्त्व वाद घालत असतील तर वाहक चालकाला काहीच न बोलता घंटीने ...
नातेवाईक तिचा शोध घेत होते, तर पोलीस तिच्या नातेवाईकांचा! अखेर पोलिसांना तिच्या नातेवाईकांचा पत्ता कळला अन् २४ तासांपासून नातेवाईकांपासून दुरावल्याने प्रचंड अस्वस्थ असलेली ‘ती’ तिच्या नातेवाईकांमध्ये सुखरूप पोहचली. ...
अनियंत्रित स्कूल व्हॅन चालवून तिघांना धडक देणारा आरोपी चालक पोलीस ठाण्यातून गायब झाला आणि त्याच्याऐवजी दुसऱ्याच व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जखमीच्या कुटुंबीयांनी केलेल्या या आरोपामुळे पोलीस विभाग हादरला ...
उच्च न्यायालयाने मध्यस्थ म्हणून नेमलेल्या वकिलाच्या कक्षात वादग्रस्त बिल्डर विजय डांगरे यांनी आपल्याला धमकी दिल्याची तक्रार प्रदीप नीळकंठ खोडे यांनी सक्करदरा पोलिसांकडे नोंदवली आहे. सोमवारी दुपारी घडलेल्या या घटनेमुळे आपल्या जीवाला धोका असल्याची भीती ...