तालुक्यातील पाझर तलावांसह मासोळी प्रकल्पांनी हिवाळ्यातच तळ गाठला आहे. त्यामुळे या तलावावर अवलंबून असलेल्या गावांमध्ये पाणीटंचाईचे संकट गडद झाले आहे. मासोळी प्रकल्पातून रब्बी हंगामातील सिंचनासाठीचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. ...
शहरातील लोहा राज्य महामार्गावर कंटेनर उलटल्याची घटना शुक्रवारी (२२ डिसेंबर) रात्रीच्या सुमारास घडली. हा कंटेनर रस्त्यात आडवा उलटल्याने या मार्गावरील सर्व वाहतूक विस्कळीत झाली होती.आज दुपारपर्यंत हा ट्रक काढण्यात आला नव्हता. ...
मागील ४ महिन्यांपासूनचे थकीत वेतन व डीए च्या फरकातील रक्कम त्वरित मिळावी या मागणीसाठी पूर्णा नगर पालिकेतील कर्मचा-यांनी आज पासून कामबंद आंदोलन सुरू केले. ...
जायकवाडी धरणातून रबी हंगामासाठी डाव्या कालव्यात तीन वर्षानंतर पाणी सोडले आहे़ यावर्षीचे पहिल्या आवर्तनाचे पाणी तब्बल २२ वर्षानंतर पाथरी तालुक्यातील वितरिकेच्या शेवटच्या भागात प्रथमच पोहचले आहे. ...
जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीने घेतलेल्या पहिल्या ठरावांचेच अद्याप अनुपालन केले जात नसल्याच्या कारणावरुन संतप्त सदस्यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा गरुड यांना धारेवर धरत बैठकीतून बाहेर काढले. ...
शहरातील एका प्लंबरने दाखविलेल्या सर्तकतेमुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात बेवारस स्थितीत उपचार घेत असलेला अनोळखी युवकाला त्याचे कुटुंबिय पुन्हा भेटले आहे. ...