: जिंतूर तालुक्यातील भोगाव देवी परिसरातील संस्थानच्या विस्तीर्ण अशा ७० एकर परिसरावर पर्यटन स्थळ विकसित करण्यासाठी चळवळ उभा ठाकली असून ७ जुलैपासून या चळवळीला प्रत्यक्षात प्रारंभ होत आहे. ...
तालुक्यातील ब्राह्मणगाव, सोन्ना शिवारात हरणांचा उपद्रव वाढल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. वन विभागाने या हरणांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी वन परीक्षेत्र अधिकाऱ्यांकडे केली आहे. ...
मॉब लिंचिंगच्या प्रकरणात राज्यभरात आंदोलने सुरू असून, शुक्रवारी परभणी येथे बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. तर पूर्णा येथे जमियत उलमा व भारिप बहुजन महासंघाच्या वतीने या घटनेचा निषेध नोंदविण्यात आला. ...
राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमानुसार जिल्ह्यात सुरु आलेल्या पाणीपुरवठा योजनांची खोटी माहिती या विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी पंचायत राज समितीलाच दिली असून ही बनवाबनवी उघडकीस आल्याने समितीने संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चितीनंतर कठोर कारवा ...
शेत धुऱ्याच्या वादातून एका महिलेस मारहाण करुन विनयभंग केल्याची घटना जिंतूर तालुक्यातील संक्राळा येथे २८ जून रोजी घडली आहे. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरुन २ जुलै रोजी ५ आरोपींविरुद्ध बामणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. ...
पूर्णा तालुक्यातील केंद्रीय प्राथमिक व जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक, कर्मचाऱ्यांना २०११-१२ या वर्षात संगणक अर्हता परीक्षा उत्तीर्ण नसतानाही ५२ लाख ४८ हजार ९७८ रुपयांची जादा वेतनवाढ प्रदान करण्याचा पराक्रम जिल्हा परिषद प्रशासनाने केला असून यासंदर्भात प ...
येथील पालिका कार्यालयात मुख्याधिकाऱ्यांचे पद रिक्त असल्याने नागरिकांची कामे खोळंबली आहेत. अतिरिक्त पदभार दिलेले अधिकारीही कार्यालयात उपस्थित राहत नसल्याने नागरिकांच्या गैरसोयीत भर पडली आहे. ...
अनेक शहरांसह शेकडो गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या निम्न दुधना प्रकल्पात केवळ ५४ दलघमी पाणी शिल्लक असून हा प्रकल्प मृतसाठ्यातून बाहेर येण्यासाठी मोठ्या पावसाची प्रतीक्षा लागत आहे. ...