Pandharpur Wari 2025 News in Marathi | पंढरपूर वारी २०२५ मराठी बातम्या FOLLOW
Pandharpur wari, Latest Marathi News
Pandharpur Wari 2025: अभंग अथवा भजने गात, नामस्मरण करीत महाराष्ट्रातून वारकरी पंढरपूरला विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात. या वारीमध्ये अनेक जातिधर्माचे लोक सहभागी होतात. तुकाराम, नामदेव, ज्ञानेश्वरांच्या पालख्या शेकडो किमीचा पायी प्रवास करुन पंढरपूरात येतात. Read More
योद्ध्याला जसं रणांगणातच वीरमरण यावं असं वाटतं तसंच वारकऱ्याला वारीच्या वाटेवर मरण यावं असं वाटतं. वारकरी संप्रदायात अशा मरणाला भाग्यवान समजतात. वारकरी धर्माच्या सच्चा पाईकाच्या नशिबी असं मरण येतं. ...
पाऊले चालती पंढरीची वाट, असे म्हणत सध्या लाखो वारकरी पंढरीच्या दिशेने निघाले आहेत. या प्रवासात काहीतरी वेगळे दिसले की अनेक वारकरी आपल्या खिशातून मोबाइल काढून फोटो किंवा सेल्फी काढताना दिसतात. ...
विठ्ठल नावाचा लागलासे छंद, नाही धरबंध काही अवघा आनंद ! मुक्त होऊनिया स्मरण, पायी विठ्ठलाचे शरण, गाऊनिया गुणगान, जीवालागी समाधान ! याच भावना मनी ठेवून पुणेकरांनी रविवारी वारकऱ्यांची सेवा करण्यात समाधान मानले आणि विठ्ठल नामाचा गजर करून अवघी पुण्यनगरी आ ...
संत ज्ञानेश्वर आणि संत तुकारामांच्या पालख्या पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाल्या आहेत. सावळ्या विठूरायाच्या दर्शनाच्या ओढीने लाखो वारकरी पायी चालत निघाले आहेत. या दोन्हीही पालख्या शनिवारी पुणे मुक्कामी आल्या. ...
वारक-यांमध्ये कमालीची स्वयंशिस्त पाहायला मिळते. रात्री मुक्कामाच्या ठिकाणी समाजआरती होते. या वेळी चांदीचा चोप उंचावून आरोळी ठोकली की वारक-यांमध्ये नि:शब्द शांतता पसरते. हा चोपदाराचा नव्हे तर वारकरी माऊलींचा आदेश मानतात. ...
पालखी सोहळ्यात प्रत्येक जण आपापल्या परीने काहींना काही दान करीत असतो. मात्र भोसरीतील राजश्री जुन्नरकरने आपल्या कलेचे दान माऊली सोहळ्याच्या मार्गावरती देऊ केलयं. ...
कुळी पंढरीचा नेम। मुखी सदा नाम विठोबाचे।। असे म्हणत लाखो वैष्णव भगव्या पताका उंचावत आळंदीहून पंढरीकडे मार्गस्थ झाले. जुन्या गांधी वाड्यातील आजोळघरी ‘श्रीं’च्या पालखी सोहळ्याने आळंदीकरांचा पाहुणचार घेतला. ...