आनंदानुभूतीसाठी आणि प्रतिक्षणी वर्धमान होणाºया भक्तिसुखाच्या सेवनासाठी तसेच तो भक्तिरस सर्वांना देण्यासाठी सर्व क्षेत्रांतून संतांच्या पालख्या श्रीक्षेत्र पंढरपूरकडे येतात. जगद्कल्याणाची तळमळ घेऊन ही मांदियाळी अविरत आनंदाचा वर्षाव करीत आली आहे, करीत ...
मनुष्य देहाची इंद्रिये ही भगवंत प्राप्तीची साधने आहेत. ‘जेणे तु जोडसी नारायण’ असे संतवचन प्रसिद्ध आहे. यामध्ये ‘वाचा’ हे एक असे साधन आहे की, त्यातून निघालेल्या प्रत्येक शब्दाने आपला व्यावहारिक व आध्यात्मिक विकास होतो आहे. या वाचेलाच वाणी, बोलणं, असे ...