राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
NCP SP Group Leader Jitendra Awhad News: विधानसभेत झालेल्या पराभवानंतर एकत्रित राहायला हवे होते. हा निर्णय फार घाईने घेतला, असे दिसत आहे, असे मत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी व्यक्त करत नाराजी बोलून दाखवली. ...
दिल्लीत संसदेच्या अधिवेशनावेळी अजित पवारांसह सुनील तटकरे, प्रफुल पटेल यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. या भेटीनंतर राष्ट्रवादीचे २ गट पुन्हा एकत्र येणार अशी चर्चा सुरू झाली. ...
Beed Sarpanch Murder Case: सुरेश धस (Suresh Dhas) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात एक बडी मुन्नी आहे, असा उल्लेख करत खळबळ उडवून दिली होती. तेव्हापासून अजित पवार गटातील ती बडी मुन्नी कोण, याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. ...