राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
Ajit Pawar : विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले, तर मुख्यमंत्री कोण असेल? अशी चर्चा सुरू आहे. पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांना याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. ...
प्रत्येक नेत्याला वाटतं मी ३० वर्ष निवडून आलोय मग आता मला काही होणार नाही. मात्र तेव्हा कार्यकर्त्यांची एकसंघ फळी होती ती आता दुभंगली आहे असं दिलीप खोडपे यांनी सांगितले. ...
Bacchu Kadu Ajit Pawar : विधानसभा निवडणुकीच्या आधी अनेक नेते पक्षांतर करण्याच्या हालचाली सुरू आहेत. अशात बच्चू कडू यांनी अजित पवार शरद पवारांकडे दिसतील, असा मोठा दावा केला आहे. ...
शरद पवारांना महाराष्ट्राला दुबळं करायचं आहे का? जातीजातीत भांडणे महाराष्ट्राची जी व्यवस्था आहे ती बिघडवायची आहे का, दलित-ओबीसी नव्याने वाद निर्माण करण्याचा अध्याय घालायचा आहे का असा सवाल आमदार गोपीचंद पडळकरांनी शरद पवारांना विचारला आहे. ...
नाशिक जिल्ह्यात एका कार्यक्रमात छगन भुजबळ भाषण करत होते. तेवढ्यात जवळच असलेल्या एका मंदिरात हनुमान चालीसा सुरू झाली. यामुळे भुजबळांच्या भाषणात व्यत्यय आला. यावेळी त्यांनी मंदिरात सुरू असलेली हनुमान चालीसा बंद करण्याचा आदेश पोलिसांना दिला... ...