राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
एकीकडे मराठा समाज आरक्षणाची मागणी करत आहे. यामुळे ओबीसी समाज देखील आपल्या आरक्षणावर अतिक्रमण होतेय म्हणत प्रत्युत्तरासाठी आंदोलन करत आहे. अशातच धनगर समाजही आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाला बसला आहे. ...
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मागील काही महिन्यांपूर्वी भास्कर जाधव यांनी मेळावा घेऊन "मला काही सांगायचे आहे.." असे म्हणत मनातील खदखद कार्यकर्त्यांसमोर व्यक्त केली होती. ...
या बैठकीला उद्धव ठाकरे गटाकडून संजय राऊत आणि अनिल देसाई, काँग्रेसकडून नाना पटोले, विजय वडेट्टीवार आणि बाळासाहेब थोराट, तर शरदपवार गटाकडून जयंत पाटिल आणि जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. ...