राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
Devendra Fadanvis: देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची शक्यता वक्त केली जात आहे. आज दिल्लीत भाजपाच्या नेत्यांची बैठक होत असून फडणवीस भाजपा पक्ष संघटनेचे काम करण्यासाठी उत्सुक आहेत. ...
पवार कुटुंबात आता तीन खासदार (एक लोकसभा आणि दोन राज्यसभा) आणि दोन आमदार (एक उपमुख्यमंत्री, एक आमदार) अशा चक्क पाच जागा आहेत. एकाच कुटुंबात ही खिरापत वाटली गेल्याने पवारांवर घराणेशाहीची टीका होऊ लागली आहे. ...
सर्वच राजकीय पक्ष विधानसभेच्या कामाला लागले आहेत. मात्र पुण्यातील जागावरून महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षात शीतयुद्ध सुरू असल्याचे चित्र आहे..... ...