राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
Maha Vikas Aghadi Maharashtra Elections : विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्री कोण? या प्रश्नाला उत्तर देताना विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मित्रपक्षांबद्दल महत्त्वाचे भाष्य केले. ...
Maharashtra Elections : विधानसभा निवडणुकीत सगळ्यांचे लक्ष बारामती विधानसभा मतदारसंघावर असणार आहे. बारामतीत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून युगेंद्र पवार लढणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीनेही याबद्दल ...
NCP SP MP Supriya Sule News: आपल्यावर संस्कार झालेले आहेत, बैलपोळा साजरा करतो, आम्ही शेतकरी आहोत, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी गोमातेला राज्यमातेचा दर्जा देण्यासंदर्भातील निर्णयावर दिली. ...
Ajit Pawar : जन सन्मान यात्रेची माजलगावमध्ये सभा झाली. यावेळी कार्यकर्त्यांनी भाषण सुरू असतानाच जोरजोरात घोषणाबाजी केली. भाषणात व्यत्यय निर्माण झाल्याने अजित पवार संतापले आणि कार्यकर्त्यांना झापले. ...
Sunil Tatkare Sharad Pawar : अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा निवडणुकीची तयारी करत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुनील तटकरे यांनी शरद पवारांच्या नेतृत्वाबद्दल भाष्य केले आहे. ...