येत्या आठ दिवसात रानवड सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठीची निविदा काढण्याचे आश्वासन आमदार दिलीप बनकर यांनी दिल्यानंतर चार दिवसांपासून रासाका बचाव कृती समितीकडून तहसील कार्यालयासमोर नामदेव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेले साखळी उपोषण शुक्रवारी ...
आधुनिक युगामध्ये जुन्या जमान्यातील विविध वाहने आता कालबाह्य होत असल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे. शेतकऱ्यांचे दळणवळणासाठी महत्त्वाचे साधन म्हणून ओळखली जाणारी बैलगाडी आता केवळ नावापुरती उरली असून, खेडीही हायटेक होत असल्याचे हे लक्षण मानले जात आहे ...
मार्केट पाडण्याची कारवाई करू नये, या मागणीसाठी उच्च न्यायालयात गाळेधारकांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी होऊन न्यायालयाने दि. १५ डिसेंबरपर्यंत गाळे पाडण्याच्या प्रक्रियेला स्थगिती दिली आहे. ...
त्र्यंबकेश्वर ते हरसूल राज्य महामार्गावर वेळुंजे शिवारात सायंकाळी पावणेसातच्या सुमारास ट्रॅक्टर व दुचाकी यांची धडक होऊन दुचाकीवरील मुलगा ठार झाला, तर मुलाचे वडील गंभीर जखमी झाले आहेत. ...
लासलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी (दि. ४) लाल व उन्हाळ कांदा दरात सातशे ते आठशे रुपयांची घसरण झाल्याचे दिसून आले. कांदा बाजारपेठेत भाव कोसळल्याने कांदा उत्पादकांच्या गोटात चिंता व्यक्त केली जात आहे. ...