कांदा व्यापारी समदडीया यांचा कांदा ओडिसा (कोयकाबाजार) येथील चंदनेश्वर एन्टरप्रायजेस येथे पोहोच करण्यासाठी विश्वासाने संशयितांना गाडीत भरून दिला असता, त्यांनी कांदा ओडिसा येथे पोहोच न करता अन्यत्र विक्री करून समदडीया यांची फसवणूक केली. ...
नाशिक- कोरोना वाढतोय म्हणून आरोग्य नियमांचे पालन करा असे सांगूनही त्या दुर्लक्ष करणाऱ्या दोन हॉटेल्स चालकांना महापालिकेने पाच पाच हजार रूपयांचा दंड केला केला आहे. शनिवारी (दि.१३) ही कारवाई स्वत: महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी केली असून त्यामुळे प ...
कोरोना संसर्गाचा धोका पुन्हा वाढू लागल्याने प्रशासनाने खबरदारीची उपाययोजना म्हणून जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवा वगळता शाळा महाविद्यालयांसबतच अन्य सर्व दुकाने सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. प्रशासनाच्या आदेशाला शहरासह उपन ...
गृह विलगिकरणातील बाधित बाहेर फिरताना आढळल्यास त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येईल त्याच बरोबर गुन्हे दाखल करण्यात येईल असेही आयुक्त कैलास जाधव यांनी सांगितले. ...
सरपंचपदासाठी २ कोटी ५ लाख रुपयांची बोली लावण्याच्या घटनेने चर्चेत आलेल्या उमराणे ग्रामपंचायतीसाठी शुक्रवारी (दि.१२) घेण्यात आलेल्या निवडणुकीत रामेश्वर ग्रामविकास पॅनलने १६ जागांवर विजय मिळवत सत्ताधारी ग्यानदेव दादा देवरे पॅनलचा दारुण पराभव केला आहे. ...
यवतमाळच्या वणी येथील प्रणाली चिकटे या युवतीने गतवर्षी ऑक्टोबर महिन्यापासून पर्यावरण स्वच्छतेच्या संदेशासह सायकलवर राज्यभ्रमणास प्रारंभ केला. शुक्रवारी हाच संदेश घेऊन ती नाशिकला दाखल झाली आहे. ...
शुक्रवारी सायंकाळी शहरातील अनेक मार्गांवर वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले. विशेषत: गडकरी चौक ते मुंबई नाका दरम्यान वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्याचप्रमाणे अशोकस्तंभ, सीबीएस आणि शालिमार चौकातही काही प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याने वाहतूक यंत्रणा ...
कोरेानाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या निर्बंधानुसार, शनिवार आणि रविवार असे सलग दोन दिवस बाजारपेठा पूर्णपणे बंद राहाणार आहेत. वृत्तपत्र वितरणासह जीवनाश्यक सेवा मात्र सुरळीत सुरू राहतील. ...