गृह विलगिकरणातील बाधित बाहेर फिरताना आढळल्यास त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येईल त्याच बरोबर गुन्हे दाखल करण्यात येईल असेही आयुक्त कैलास जाधव यांनी सांगितले. ...
सरपंचपदासाठी २ कोटी ५ लाख रुपयांची बोली लावण्याच्या घटनेने चर्चेत आलेल्या उमराणे ग्रामपंचायतीसाठी शुक्रवारी (दि.१२) घेण्यात आलेल्या निवडणुकीत रामेश्वर ग्रामविकास पॅनलने १६ जागांवर विजय मिळवत सत्ताधारी ग्यानदेव दादा देवरे पॅनलचा दारुण पराभव केला आहे. ...
यवतमाळच्या वणी येथील प्रणाली चिकटे या युवतीने गतवर्षी ऑक्टोबर महिन्यापासून पर्यावरण स्वच्छतेच्या संदेशासह सायकलवर राज्यभ्रमणास प्रारंभ केला. शुक्रवारी हाच संदेश घेऊन ती नाशिकला दाखल झाली आहे. ...
शुक्रवारी सायंकाळी शहरातील अनेक मार्गांवर वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले. विशेषत: गडकरी चौक ते मुंबई नाका दरम्यान वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्याचप्रमाणे अशोकस्तंभ, सीबीएस आणि शालिमार चौकातही काही प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याने वाहतूक यंत्रणा ...
कोरेानाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या निर्बंधानुसार, शनिवार आणि रविवार असे सलग दोन दिवस बाजारपेठा पूर्णपणे बंद राहाणार आहेत. वृत्तपत्र वितरणासह जीवनाश्यक सेवा मात्र सुरळीत सुरू राहतील. ...
कोरोना रुग्णांच्या संख्येत सलग तिसऱ्या दिवशीही अकराशेहून अधिक वाढ कायम असून जिल्ह्यात शुक्रवारी (दि. १२) तब्बल ११३५ नवीन कोरोनाबाधित आढळून आल्याने जिल्हा प्रशासन यंत्रणेसमोर पेच निर्माण झाला आहे. ४५६ रुग्ण कोरोनामुक्त झाले असले, तरी नाशिक शहरात ३ तर ...
राज्यातील प्रत्येक विद्यापीठात आदिवासी मुलांच्या वसतिगृहासाठी शासनाने जागा उपलब्ध करून दिली असून, भविष्यात आदिवासी विद्यार्थ्यांना नर्सरीपासून शिक्षण सुरू करण्याचा विचार सुरू असल्याचे प्रतिपादन आदिवासी विकासमंत्री के.सी. पाडवी यांनी केले. ...
दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथे वरदविनायक एक्सपोर्ट प्रा.लि. येथील कामगारांच्या झोपड्यांमध्ये आयशर घुसल्याने चालक बाळू वामन गांगुर्डे, रा. राजापूर याच्याविरोधात ड्रंक ॲॅण्ड ड्राइव्हचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...