नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची तारीख जाहीर झाल्याने निवडणुकीच्या मोर्चेबांधणीला सुरुवात झाली असून, बुधवारी (दि. १७) सत्ताधारी पिंगळे गटाने हरसूल येथे सहविचार सभा आयोजित करून ‘आपला पॅनल’ची घोषणा केली. आमदार हिरामण खोसकर यांच्याहस्ते प्र ...
अभोणा येथील ग्रामीण रुग्णालय परिसरातील शवविच्छेदन कक्षाबाहेरील झाडाला गळफास लावून एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (दि. १८) सकाळी ८ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. ...
प्रवीण नामदेव हिरे यांच्या डाबळीत शेत वस्तीवर बांधलेल्या वासरावर गुुुरुवारी (दि.१८) पहाटेच्यासुमारास बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात वासरू ठार झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे शेतशिवारात राहणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...
सिन्नरचा ऐतिहासिक व धार्मिक ठेवा असलेल्या पुरातन गोंदेश्वर मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या दीपोत्सवाच्या मंद उजेडात गोंदेश्वर मंदिर उजाळून निघाले होते. पणती पौर्णिमेनिमित्त आयोजित कार्यक्रमात हजारों पणत्यांच्या प्रकाशात न्हाऊन निघालेल्या गोेंदेश्वर मं ...
सकाळच्या सुमारास निफाड तालुक्यातील डोंगरगाव येथील भाऊसाहेब सखाहरी साबळे या युवकाने विंचूर येथे गुरुवारी (दि.१८) अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत त्याला रोखत लासलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. पो ...
चांदवड तालुक्यातील पाटे येथे बुधवारी ( दि. १७) सकाळी ११ वाजेच्या सुमारास तळेकर कुटुंबीयातील दोन सख्ख्या भावंडांचा घरच्याच शेततळ्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. संजय तळेकर यांना ही दोनच मुले असल्याने तळेकर कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळल ...
नवीन पिकाची सुरू झालेली आवक आणि नाफेडकडे असलेला कांदा बाजारात येऊ लागताच खुल्या बाजारात उन्हाळ कांद्याच्या दरात घसरण सुरू झाली असून मागील आठ दिवसांत क्विंटलमागे सुमारे १००० ते १५०० रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये तीव्र न ...