महापालिका प्रशासनाच्या वतीने प्लॅस्टिक कॅरिबॅग वापरण्यावर बंदी घालण्यात आली. मात्र गेल्या काही दिवसांपासून सिडको, अंबड व परिसरात सर्रासपणे प्लॅस्टिक कॅरिबॅगचा वापर केला जात असून, त्याला आळा घालण्यास मनपाचा नियोजनशून्य व ढिसाळ कारभार अपयशी ठरला आहे. ...
दिपावलीच्या दहा दिवसांच्या सुट्टीनंतर उमराणे बाजार समितीतील कांदा व भुसार शेतमालाचे लिलाव पुर्ववत सुरु झाले असुन लाल कांद्याचे दर तेजीतच असुन उन्हाळ कांद्याच्या दरात मात्र काहीअंशी घसरण झाल्याचे चित्र दिसुन आले. ...
सिन्नर-संगमनेर महामार्गावर दुचाकी आणि दुधाचा टॅँकर यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना रविवारी (दि. ११) दुपारी साडेचारच्या सुमारास मनेगाव फाट्याजवळ घडली. ...
बागलाण तालुक्यातील मळगाव भामेर येथील पोहाणे शिवारात सोमवारी (दि.१२) पहाटेच्या सुमारास वनविभागाच्या जंगलात दहा जणांच्या टोळीने चिंकारा या नर जातीच्या हरणाची शिकार केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला. ग्रामस्थांच्या मदतीने वनविभागाने सापळा रचून तीन जणां ...
सकाळी दहा वाजता सुरू झालेल्या या आंदोलनात कार्यकर्त्यांनी नोटबंदीच्या दुष्परिणामांचे फलक फडकविले. प्रदेश कॉँग्रेसने नोटबंदीच्या दुस-या वर्षपुर्तीनंतर ९ नोव्हेंबर रोजीच आंदोलनाची हाक दिली असली तरी, भाऊबीज असल्यामुळे आंदोलन दोन दिवस पुढे ढकलण्यात आले. ...
आंदोलनकर्त्यांनी आयुक्तालयाच्या कारभाराविरोधात घोषणाबाजी केली. अनेक आदिवासी विद्यार्थ्यांना अद्यापही वसतीगृहात प्रवेश मिळालेला नसल्यामुळे ते शिक्षणापासून वंचित राहात असून, अशा सर्व विद्यार्थ्यांना वसीतगृहात प्रवेश देण्यात यावा, दिडशे मुले व शंभर मुली ...
गेल्या आठवड्यापासून टोमॅटोला ३० ते ४० रुपये प्रति जाळी (२० किलो) असा बाजारभाव मिळत आहे. टोमॅटोची लागवड, कीड टाळण्यासाठी औषधे, दळणवळण तसेच हमाली खर्च देखील या भावामुळे सुटत नसल्याने सध्या तरी टोमॅटो उत्पादक शेतकºयांवर आर्थिक संकट कोसळले आहे. ...
देवळा : येथे शासकीय आधारभूत किंमत १७०० रु पये प्रति क्विंटल दराने मका खरेदीसाठी आॅनलाईन बुकिंगचा शुभारंभ शेतकी संघाचे अध्यक्ष चिंतामण अहेर यांच्या हस्ते करण्यात आला. ...