उच्च न्यायालयाच्या स्थगिती आदेशाचे उल्लंघन करत अनधिकृत असलेल्या ‘ग्रीन फिल्ड’ या मिळकतीची भिंत अतिक्रमण निर्मूलन विभागाने पाडली. न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल महापालिकेला न्यायालयाने पुन्हा भिंत बांधावी, असे आदेशित करून एकप्रकारे शिक्षा ठोठावली. ...
महापालिकेच्या शिक्षण समितीत नऊ आणि वृक्ष प्राधिकरण समितीत केवळ दोन नगरसेवकांना सदस्य म्हणून नियुक्त करण्याचे प्रशासनाचे प्रस्ताव फेटाळत महासभेत महापौरांना सदस्य नियुक्तीचे स्वातंत्र दिले. ...
शहरातील जुने नाशिक येथील संत नामदेव विठ्ठल मंदिरासह उपनगरातील विविध मंदिरांमध्ये समस्त शिंपी समाज संस्थेतर्फे संत नामदेव महाराज यांचा जयंती सोहळा उत्साहत साजरा करण्यात आला. ...
प्रकल्पग्रस्तांना शासनाने मंजूर केलेली भरपाई रक्कम देण्यास टाळाटाळ केल्याने सिडको प्रशासनावर आलेली जप्तीची नामुष्की टाळण्यासाठी व प्रकल्पग्रस्तांचे रक्कम भरण्यासाठी मुदत वाढ मिळण्यासाठी प्रशासकांची धावधाव सुरू असल्याचे दिसून येत आहे. ...
भूखंड मिळण्यासाठी उद्योजकांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे केलेले सर्व अर्ज महामंडळाने रद्द (रिजेक्ट) करण्याचा सपाटा लावला असून, यापुढे फक्त आॅनलाइन अर्जाचाच विचार केला जाणार आहे. ...
शहरात वाहन चोरीच्या घटना सुरूच असून, चोरट्यांनी रिक्षासह दुचाकी चोरून नेली आहे़ पंचवटी व गंगापूर पोलीस ठाणे हद्दीत या घटना घडल्या आहेत़ दरम्यान, शहरातील वाढत्या वाहन चोरीच्या घटना रोखण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. ...
शिक्षक हे मुलांचे भावविश्व जवळून पाहत असतो. तसेच शिक्षक स्वत:तील बालमन सांभाळून कविता करतो. बालकविता करताना बालमन समजून घ्यावे लागते. तसेच मुलांचे भावविश्व समृद्ध करण्यासाठी अन्य भाषांमधील कवितांचा अनुवाद झाला पाहिजे, असे प्रतिपादन लेखिका मंदा खांडगे ...
रक्षा संपदा विभागाच्या नव्या निर्णयानुसार गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या देवळालीच्या १३५ पैकी १३३ लीज लँडच्या नूतनीकरणाचा प्रश्न मार्गी लागला असून, यातील दोन प्रकरणांवर बोर्डात चर्चा करण्यात आली. ...