नाशिक शहरात कामटवाडा येथील धन्वंतरी मेडीकल कॉलेजजवळील राहणाºया एका व्यक्तीच्या युनियन बँक आॅफ इंडियाच्या खात्याशी संलग्न डेबीट कार्डविषयी फोनवरून गोपनीय माहिती विचारून तब्बल ७८ हजार ९०७ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...
यंदा मान्सूनचे आगमन उशिराने व धीम्या गतीने झाल्यामुळे जुलै महिन्याच्या तिस-या आठवड्यापर्यंत खरिपाच्या जेमतेम पेरण्या होऊ शकल्या होत्या. त्यानंतर मात्र पावसाने जोर धरल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्यांना वेग दिला. ...
मूळ अमेरिका त्यानंतर भारतात उत्तराखंडाच्या मार्गाने प्रवेश करणा-या अमेरिकन लष्करी अळीने यंदा खरिपाच्या मक्यावर घाला घातला आहे. प्रारंभी स्वीटकॉर्नवर आढळलेली अळी खरिपात सरसकट मक्यावर दिसू लागली असून, जिल्ह्यातील सुमारे सव्वा दोन लाख हेक्टरवरील मक्यापै ...
सायखेडा : उत्तरा नक्षत्रात सुरु असलेल्या धुवाधार पावसाने सगळीकडे हजेरी लावल्याने परिपक्वतेच्या अंतिम टप्प्यात आलेली खरीप हंगामातील पिके वाया जाण्याची शक्यता आहे. द्राक्ष पीक धोक्यात आले आहे. ...
लासलगाव : दक्षिणेकडील राज्यात कांदा आवक वाढल्याने तसेच इजिप्तचा कांदा देखील भारतीय व्यापारी बाजारपेठेत लवकरच आणत असल्याचा एकूण परिणामामुळे जिल्ह्यात बाजारपेठेतील कांदा भावात एकाच दिवसात सहाशे पन्नास रूपयांची घसरण झाली. ...
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील पुर्व भागात गुरूवारी जोरदार पर्जन्यवृष्टी झाली असून जणू काही ढगफूटीप्रमाणे तीन ते चार तासापासून पडलेल्या जोरदार पावसामुळे अस्वली स्टेशन, नांदूरवैद्य या परिसरात पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली. ...