पोलिसांची घेराबंदी, नाकाबंदी अपयशी ठरत असून सोनसाखळीचोर मोकाट फिरत असल्याने संताप व्यक्त होत आहे. मुंबईनाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या सोनसाखळीचोरीच्या घटनेमुळे हे स्पष्ट झाले आहे. ...
तीन वर्षांत दामदुप्पट, तसेच गुंतवणुकीच्या पैशातून प्लॉट, जमिनी व जागा देण्याचे आमिष दाखवून परीसस्पर्श अॅण्ड लॅण्ड डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने शहरातील शेकडो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा आणखी प्रकार समोर आला आहे़ ...
भाडेतत्त्वावर घेतलेले हॉटेल खाली करून न देता याउलट मालकाकडेच १५ लाखांची खंडणी मागितल्याचा प्रकार गंगापूर रोडवरील बारदान फाटा परिसरात घडला आहे़ या प्रकरणी संशयित शेखर रमेश देवरे (रा. मालवणी हॉटेल, बारदान फाटा) याच्या विरोधात गंगापूर पोलिसांनी खंडणीचा ...
बाटा शूज कंपनीतील स्टोअर मॅनेजरने कंपनीच्या मालाची चोरी करून त्याची परस्पर विक्री करून चार लाखांचा अपहार केल्याचा प्रकार समोर आला आहे़ या प्रकरणी भद्रकाली पोलिसांनी स्टोअर मॅनेजर विशाल दिलीपसिंग पाटील (रा. अतुल डेअरीजवळ, सिडको,) विरोधात अपहाराचा गुन् ...
वर्दीबाबत प्रत्येक पोलीस अधिकारी व कर्मचा-यास अभिमान असायलाच हवा, तसाच तो स्वत:बद्दलही असणे गरजेचे आहे़ चांगली मानसिकता, शारीरिक सुदृढता याबरोबरच आपले कुटुंबीय, आपले शहर, राज्य, देश व समाजाप्रती पोलीस कर्मचाºयांना आपुलकी असणे गरजेचे असून, प्रत्येकाने ...
माजी नगरसेवक सुरेश दलोड यांच्यावर शनिवारी झालेल्या हल्ल्यानंतर रविवारी सायंकाळी वडाळानाका परिसरात दगडफेकीची घटना घडल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी तत्काळ बंदोबस्तात वाढ करून परिस्थिती नियंत्रणात आणली. ...
पोलिसातील तक्रार मागे न घेणाऱ्या महिलेवर तलवारीने वार केल्याची घटना शनिवारी (दि़१७) रात्रीच्या सुमारास कर्णनगरमध्ये घडली. लक्ष्मी सुनील पवार (३५) असे जखमी महिलेचे नाव असून या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी संशयित संतोष रामु पवार, रामू जेटिबा पवार, शंकर राम ...