नम्रता आवटे-संभेरावने आपल्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे.महाराष्ट्राचा सुपरस्टारच्या अंतिम फेरीत धडक मारत तिने स्वतःमधील अभिनय कौशल्य सिद्ध केले. 'फु बाई फु', 'कॉमेडीची बुलेट ट्रेन' या विनोदी कार्यक्रमांमधून प्रेक्षकांना खळखळून हसवले. तर 'पुढचं पाऊल', 'लज्जा', 'ह्या गोजिरवाण्या घरात', 'एक मोहोर अबोल' या मालिकांमधून तिने गंभीर धाटणीच्या भूमिकादेखील निभावल्या. 'बाबू बँड बाजा' या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे विशेष कौतुक झाले. विशेष म्हणजे प्रियांका चोप्राची निर्मिती असलेल्या 'व्हेंटिलेटर' या चित्रपटात तिने साकारलेली भूमिकासुद्धा खूप गाजली. नम्रताने छोट्या आणि मोठ्या पडद्यासोबतच रंगभूमीवरही स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. 'पहिलं पहिलं' हे विनोदी नाटकसुद्धा बरंच गाजले. Tag plz Read More
Namrata Sambherao And Prasad Khandekar : नम्रता संभेरावने २०१३ आणि २०२४ मधला प्रसाद खांडेकरसोबतचा फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करत तिने प्रसादला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ...
Nach Ga Ghuma Movie : मुक्ता बर्वे आणि नम्रता संभेराव यांचा 'नाच गं घुमा' हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. गेल्या कित्येक दिवसांपासून या चित्रपटाची प्रेक्षक वाट पाहत होते. आता या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. ...