"घुमा जोरात नाचते आहे..!", टाइम्स स्क्वेअरजवळ थिरकल्या मुक्ता बर्वे, कादंबरी कदम आणि पर्ण पेठे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2024 02:36 PM2024-05-16T14:36:21+5:302024-05-16T14:37:28+5:30

Nach Ga Ghuma Movie : 'नाच गं घुमा' चित्रपटाला मिळणारा उदंड प्रतिसाद पाहून अभिनेत्री मुक्ता बर्वे हिने सोशल मीडियावर प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. इतकेच नाही तर तिने अमेरिकेतील प्रसिद्ध टाइम्स स्क्वेअरजवळ डान्स करतानाचा व्हिडीओ देखील शेअर केला आहे.

"Ghuma is dancing hard..!", Mukta Barve, Kadambari Kadam and Parn Pethe danced near Times Square. | "घुमा जोरात नाचते आहे..!", टाइम्स स्क्वेअरजवळ थिरकल्या मुक्ता बर्वे, कादंबरी कदम आणि पर्ण पेठे

"घुमा जोरात नाचते आहे..!", टाइम्स स्क्वेअरजवळ थिरकल्या मुक्ता बर्वे, कादंबरी कदम आणि पर्ण पेठे

अभिनेत्री मुक्ता बर्वे (Mukta Barve) आणि अभिनेत्री नम्रता संभेराव(Namrata Sambherao)ची मुख्य भूमिका असलेला चित्रपट 'नाच गं घुमा'(Nach Ga Ghuma)ची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. हा चित्रपट १ मे रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाला महाराष्ट्रात खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. दरम्यान आता चित्रपटाला मिळणारा उदंड प्रतिसाद पाहून अभिनेत्री मुक्ता बर्वे हिने सोशल मीडियावर प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. इतकेच नाही तर तिने अमेरिकेतील प्रसिद्ध टाइम्स स्क्वेअरजवळ डान्स करतानाचा व्हिडीओ देखील शेअर केला आहे.

अभिनेत्री मुक्ता बर्वे हिने इंस्टाग्रामवर नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात पाहायला मिळतंय की, अमेरिकेतील प्रसिद्ध टाइम्स स्क्वेअर जवळ मुक्ता, अभिनेत्री पर्ण पेठे आणि कादंबरी कदम नाच गं गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. यावेळी तिघींनी साडी नेसली आहे. खरेतर हा व्हिडीओ मुक्ता नाटकाच्या दौऱ्यासाठी परदेशात असताना शूट केला आहे.

मुक्ता बर्वेने हा व्हिडीओ शेअर करत लिहिले की, प्रेक्षकांच्या प्रेमाचा आणि उदंड प्रतिसादाचा ३ रा आठवडा … घुमा जोरात नाचते आहे…धन्यवाद. मुक्ताच्या पोस्टला चाहत्यांची पसंती मिळताना दिसत आहे. यापूर्वीही मुक्ताने परदेशात नाच गं घुमा गाण्यावर डान्स करतानाचे व्हिडीओ शेअर केले आहेत. 

सिनेमाबद्दल...

परेश मोकाशी दिग्दर्शित 'नाच गं घुमा'मध्ये मुक्ता बर्वे आणि नम्रता संभेरावसह या सिनेमात सुकन्या मोने, सुप्रिया पाठारे, सारंग साठ्ये, मायरा वायकुळ या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी 'नाच गं घुमा' सिनेमाने तब्बल २ कोटींचा गल्ला जमवला आहे.

Web Title: "Ghuma is dancing hard..!", Mukta Barve, Kadambari Kadam and Parn Pethe danced near Times Square.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.