नम्रता आवटे-संभेरावने आपल्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे.महाराष्ट्राचा सुपरस्टारच्या अंतिम फेरीत धडक मारत तिने स्वतःमधील अभिनय कौशल्य सिद्ध केले. 'फु बाई फु', 'कॉमेडीची बुलेट ट्रेन' या विनोदी कार्यक्रमांमधून प्रेक्षकांना खळखळून हसवले. तर 'पुढचं पाऊल', 'लज्जा', 'ह्या गोजिरवाण्या घरात', 'एक मोहोर अबोल' या मालिकांमधून तिने गंभीर धाटणीच्या भूमिकादेखील निभावल्या. 'बाबू बँड बाजा' या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे विशेष कौतुक झाले. विशेष म्हणजे प्रियांका चोप्राची निर्मिती असलेल्या 'व्हेंटिलेटर' या चित्रपटात तिने साकारलेली भूमिकासुद्धा खूप गाजली. नम्रताने छोट्या आणि मोठ्या पडद्यासोबतच रंगभूमीवरही स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. 'पहिलं पहिलं' हे विनोदी नाटकसुद्धा बरंच गाजले. Tag plz Read More
नम्रतानेही विकी कौशलच्या गाण्यावर डान्स करत रील व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला. पण, तिचा हा प्रयत्न पुरता फसला. नम्रताने तिच्या इन्स्टाग्रामवर याचाच व्हिडिओ शेअर केला आहे. ...