शुक्रवारी रात्री २ वाजता एक ३५ वर्षाचा युवक नागपूर रेल्वेस्थानकावर आला. रेल्वे रुळावर बसून त्याने एक सेल्फी घेऊन ‘अलविदा दोस्तो’ असा मॅसेज व्हॉट्सअॅपवर मित्रांना टाकला. थोड्या वेळात या रुळावरून मालगाडी मुंबईकडे जात होती. युवकाला पाहून मालगाडीच्या लो ...
संविधान हे देशातील सर्व धर्म, पंथ व लोकांना एकसंध ठेवण्याचे काम करते. त्यामुळे या संविधानाच्या रक्षणाचे कार्य सरकारचे आहे. परंतु गेल्या चार वर्षात सरकार ते करीत नसल्याचे दिसून येते. उलट संविधान न मानणाऱ्यांनापाठीशी घालण्याचे कार्य सरकारकडून होताना दि ...
डेंग्यूचा प्रकोप दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. शासकीयसह खासगी रुग्णालय या आजाराच्या रुग्णांनी खचाखच भरली आहेत. एकट्या नागपुरात आतापर्यंत २०० वर रुग्णांची नोंद झाली आहे. लहान मुलांसोबतच मोठेही या आजाराच्या विळख्यात सापडली आहेत. एकीकडे डेंग्यूसदृश आजारान ...
मेट्रो रेल्वेच्या नागपूर प्रकल्पाचे एकूण बांधकाम ७० टक्के पूर्ण झाले आहे. रिच-१ मध्ये मिहान डेपो ते सीताबर्डी मुंजे चौक १२ कि़मी. आणि रिच-२ मध्ये लोकमान्यनगर ते मुंजे चौक १२ कि़मी. अशा एकूण २४ कि.मी मार्गावर मेट्रो रेल्वे मार्च-२०१९ पर्यंत धावणार आहे ...
बहुप्रतीक्षित व राज्य शासनाचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’असलेल्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) एमबीबीएस अभ्यासक्रमाला सप्टेंबरपासून सुरुवात होत नाही तोच महिनाभरातच ‘एम्स’ला संचालकही मिळाले. मेजर जनरल डॉ. विभा दत्ता यांची या पदी वर्णी लागली. संचाल ...
शहरातील तलावात आॅक्सिजनची मात्रा कमी होत आहे. प्रदूषणामुळे तलावातील जलचर आॅक्सिजनसाठी तडफत आहे. यात सर्वाधिक गंभीर स्थिती फुटाळा तलावाची आहे. गांधीसागर तलावाची अवस्थासुद्धा काहीशी अशीच आहे, असा खुलासा ग्रीन व्हिजिल फाऊंडेशनद्वारे करण्यात आला आहे. ...
मानकापूर क्रीडा संकुल परिसरात सुरू असलेल्या आंतरशालेय विभागीय क्रीडा स्पर्धेत विविध जिल्ह्यातून खेळाडू मंगळवारी सकाळी पोहचले. पण आयोजकांनी ऐनवेळी काही खेळ रद्द करून दुसऱ्या दिवशी घेण्याचे ठरविल्याने, बाहेरगावाहून आलेल्या विद्यार्थ्यांसह शिक्षकांची चा ...
कर्मचारी भविष्य निधी संघटनेकडे निवृत्तीवेतनधारक मोठ्या विश्वासाने पाहत असतात. मात्र संघटनेच्या नागपूर कार्यालयाच्या कार्यप्रणालीमुळे ज्येष्ठ नागरिकांसमोर मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. मासिक निवृत्तीवेतन वाढीसाठी कार्यालयाकडून अनेक निवृत्तीवेतनधारकांन ...