‘लॉकडाऊन’च्या काळात हातावर पोट असलेल्या जनतेला शिवभोजन थाळीने मोठा आधार दिला आहे. नागपूर विभागात शिवभोजन थाळीची योजना ८१ केंद्रांमार्फत राबविण्यात येत आहे. या केंद्रांवर दररोज ११ हजार ९०० जेवणाच्या थाळी वाटपाचे उद्दिष्ट दिले आहे. ...
वारंवार औषधोपचार करूनही जीवघेण्या वेदनापासून आराम मिळत नसल्यामुळे वैतागलेल्या एका तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली. मानकापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत सोमवारी दुपारी ही करुण घटना घडली. ...
ऑनलाईन गेमच्या नादातून नैराश्य आल्यामुळे जयताळ्यात राहणाºया एका युवकाने गळफास लावून आत्महत्या केली. सुभाष अनंतराव मानेश्वर (वय १८) असे मृत युवकाचे नाव आहे. ...
तरुणांच्या दोन गटात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या वादाचे पर्यवसान एका तरुणावर प्राणघातक हल्ल्यात झाले. या हल्ल्यात कळमन्यातील एका वाहतूक व्यावसायिकाचा मुलगा गंभीर जखमी झाला. ...
सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या बाह्यरुग्ण विभागात रुग्णांची गर्दी होत असल्याने ‘फिजिकल डिस्टन्सिंग’ पाळणे कठीण जाते. परिणामी, रुग्णालय प्रशासनाने रुग्णांची रांग रुग्णालयाबाहेर लावण्याचे आदेश काढले. परंतु आवश्यक सोय न केल्याने रुग्णांना उन्हात तासन्तास ...
परप्रांतीय मजुरांना त्यांच्या गावी पाठविण्याची व्यवस्था कशी आहे, त्यांना खाण्यापिण्याच्या चीजवस्तू सोबत दिल्या की नाही, ते जाणून घेण्यासाठी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी आज पांजरी टोलनाक्यावरच्या कॅम्पमध्ये जाऊन पाहणी केली. ...
‘सिव्हिअरली अॅक्यूट रेस्पिरेटरी इलनेस’ म्हणजे ‘सारी’चे रुग्ण वाढत असताना ते कोविड पॉझिटिव्ह येत असल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. आज पुन्हा दोन रुग्ण पॉझिटिव्ह आले. यासह दिवसभरात १३ कोरोनाबाधितांची नोंद झाली. ...