१९५३ साली झालेल्या नागपूर करारानुसार दरवर्षी महाराष्ट्र सरकारचे एक अधिवेशन नागपूर येथे घेण्यात येते. दरवर्षी हे अधिवेशन हिवाळा सुरु असताना घेण्यात येत असल्याने या अधिवेशनाला नागपूर हिवाळी अधिवेशन म्हणून संबोधले जाते. विदर्भाच्या प्रश्नांना अग्रक्रम मिळाला पाहिजे यासाठी दरवर्षी विधानमंडळाचे एक अधिवेशन नागपुरात भरवले जाईल असं करारात नमूद करण्यात आलं आहे. भाजपा सरकारच्या काळात पहिल्यांदा हे अधिवेशन पावसाळ्यात नागपुरात भरविण्यात आले होते. Read More
नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनासाठी तैनात करण्यात आलेल्या पोलिसांच्या सोईसुविधांकडे सरकारचे लक्ष नसल्याचा औचित्याचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आणि विधानमंडळ गटनेते जयंत पाटील यांनी शुक्रवारी विधानसभेत मांडत ...
केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्य शासनाने राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गामधील उन्नत व प्रगत व्यक्ती/गट याकरिता (नॉन क्रिमिलेअर) उत्पन्नाची मर्यादा सहा लाख रुपयांवरून आठ लाख रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी ...
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमुळे मुंबईची कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली असून परप्रांतीय हॉकर्स संकटात आहेत. ही परिस्थिती राजकीय राज ठाकरे यांच्यामुळे ओढवल्याचा आरोप आ. अबू आजमी यांनी बुधवारी विधानसभा परिसरात केला. ...
पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई आयुक्तालयांतर्गत तसेच काही जिल्ह्यात आठ तास कर्तव्य प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे २४ तासाच्या कालावधीत सतत १० तासांच्यावर बंदोबस्त ड्युटी किंवा इतर कामासाठी हजर राहावे लागल्यास संबंधित पोलीस कर्मचारी ...
‘रोजीचा रोटीचा सवाल रोजचाच आहे...’ या नारायण सुर्वे यांच्या कवितेतील ओळी राज्यातील १६० केंद्रीय अनुसूचित जाती निवासी आश्रमशाळेतील ३४०० शिक्षक - शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना तंतोतंत लागू पडतात. पगाराविना हे कर्मचारी काम करीत असून उदरनिर्वाह कसा करावा, असा ...
विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत सुरू असलेल्या जिगांव सिंचन प्रकल्पात झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले असून तपास प्रगतिपथावर आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मंगळवारी उपस्थित प्रश्नाच्या लेखी उत्तरात ...
मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत त्वरित आरक्षण लागू करावे, या मागणीसाठी शिवसेनेच्या १० आमदारांनी हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानभवन परिसरात लाक्षणिक उपोषण केले. ...
काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राज्य सरकार विरोधात नागपूरच्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावर काढण्यात येणाऱ्या ‘जनआक्रोश-हल्लाबोल’ मोर्चाला सुरुवात झाली आहे. मोर्चासाठी दोन्ही पक्षाचे राज्यभरातील हजारो कार्यकर्ते नागपूरच्या रस्त्यावर उतरले आहेत ...