पहुर विकास आघाडी  म्हणते, मनं काय जोडता; नदी जोडा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 09:53 PM2017-12-15T21:53:24+5:302017-12-15T21:54:44+5:30

सध्या ‘मन की बात’वर जोरदार चर्चा केली जाते. त्याद्वारे काय साध्य होणार, त्याचे फलित काय, हा प्रश्नच आहे. खरंच ‘मन की बात’ केल्याने मनं जुळतात काय, मनं जोडण्याऐवजी नदी जोडा, शेतकऱ्यांचे आशीर्वाद मिळतील, ही आशा आहे जामनेर (जि. जळगाव) येथील पहुर विकास आघाडीला.

Pahur Vikas Aghadi says what the mind adds; Add river! | पहुर विकास आघाडी  म्हणते, मनं काय जोडता; नदी जोडा!

पहुर विकास आघाडी  म्हणते, मनं काय जोडता; नदी जोडा!

Next
ठळक मुद्देउपोषणाचे सहावे वर्ष : न्याय कधी मिळणार?

गणेश खवसे 
ऑनलाईन लोकमत
नागपूर : सध्या ‘मन की बात’वर जोरदार चर्चा केली जाते. त्याद्वारे काय साध्य होणार, त्याचे फलित काय, हा प्रश्नच आहे. खरंच ‘मन की बात’ केल्याने मनं जुळतात काय, मनं जोडण्याऐवजी नदी जोडा, शेतकऱ्यांचे आशीर्वाद मिळतील, ही आशा आहे जामनेर (जि. जळगाव) येथील पहुर विकास आघाडीला. नदी जोड प्रकल्पासाठी या आघाडीतर्फे सातत्याने धरणे आंदोलन, उपोषण केले जात आहे. हिवाळी अधिवेशनानिमित्त पुन्हा एकदा ही समिती न्याय्य हक्कासाठी मैदानात उतरली आहे. या संघटनेचे आंदोलनाचे हे सहावे वर्ष आहे, हे विशेष!
तापी ते वाघूर नदी जोड प्रकल्प राबविण्यात यावा, या मागणीसाठी सुकलाल बारी यांच्या नेतृत्वात गेल्या सहा वर्षांपासून आंदोलन करण्यात येत आहे. जळगाव जिल्ह्यातील जामनेर, पाचोरा, बोदवड, सोयगाव ही चारही तालुके कमी पर्जन्यमान क्षेत्रात येतात. त्यामुळे या तालुक्यांमध्ये सतत दुष्काळसदृश स्थिती असते. या तालुक्यांमध्ये पाण्याची पातळी ७०० फुटांपर्यंत खालावलेली असून भविष्यात पाण्याची गंभीर समस्या उद्भवणार आहे.
पिण्यासाठीच पाणी मिळणार नाही तिथे सिंचनासाठी तरी मिळणार काय, हा बिकट प्रश्न आहे. यामुळे यातून वाचण्यासाठी ‘नदी जोड’ प्रकल्प राबविणे आवश्यक आहे. मुक्ताईनगरपासून आलेल्या तापी नदीतील पाणी कांग नदीत आणि वाघूर नदीत पाटाद्वारे टाकावे. त्यामुळे वाघूर नदीत पाणी येऊन भूगर्भातील पाण्याची पातळी वाढेल. विहिरी, तलावांमध्ये पाणी राहील. पिण्यासाठी पाणी उपलब्ध होऊन सिंचनासाठी त्याचा मोठा हातभार लागून शेतकरी संपन्न होईल. ही बाब पटवून देण्यासाठी धरणे आंदोलन, साखळी उपोषण, आमरण उपोषण असे आंदोलनाचे अस्त्र वापरून वाघूर विकास आघाडीने शासनाचे लक्ष वेधले. परंतु त्याचा काहीएक फायदा झालेला नाही. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या जिल्ह्यातील आणि त्यांच्याच मतदारसंघात चक्क पाणी मिळण्यासाठी अशाप्रकारचे आंदोलन करावे लागत आहे, हे विशेष! हिवाळी अधिवेशनानिमित्त पुन्हा एकदा वाघूर विकास आघाडीतर्फे धरणे आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे. त्यात सुकलाल बारी यांच्यासह भाऊराव गोंदनखेडे, रमेश पाटील, गजानन पाटील, अशोक जाधव, रामचंद्र पाटील, रवींद्र पांढरे, सुनील सोनार, भागवत पाटील, डॉ. मनोहर पाटील आदी सहभागी झाले आहेत.

वैयक्तिक नव्हे जनहिताची मागणी!
हिवाळी अधिवेशनानिमित्त धरणे - आंदोलन, उपोषण मंडपांनी पटवर्धन मैदान व्यापले आहे. धरणे आंदोलन करणाºया संघटना हा विशेषत: वैयक्तिक, स्वत:च्या मागण्यासाठी किंवा समाजाच्या, एका विशेष वर्गाच्या मागण्यांसाठी मैदानात उतरल्या आहेत. मात्र वाघूर विकास आघाडीतर्फे वैयक्तिक नव्हे तर जनहिताच्या मागणीसाठी साखळी उपोषण केले जात आहे. नदी जोड प्रकल्प राबविल्यास उपोषणकर्त्यांना त्याचा फायदा होणार असून त्यांच्या तालुक्यातील, जिल्ह्यातील नागरिकांना हितकारक ठरेल, हे विशेष! याच मागणीसाठी गेल्या सहा वर्षांपासून प्रत्येक हिवाळी अधिवेशनात धरणे आंदोलन, उपोषण करण्यात येत आहे. २०१२ मध्ये आमरण उपोषणाचा मार्गही सुकलाल बारी यांनी पत्करला. दरम्यान त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन तीन दिवस रुग्णालयात तर एक दिवस पोलीस ठाण्यातही ठेवले. परंतु त्यानंतरही त्यांनी आंदोलनाचा मार्ग जनहितासाठी सोडला नाही. नदी जोड प्रकल्प राबवित नाही, तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही त्यांनी यानिमित्ताने दिला.

Web Title: Pahur Vikas Aghadi says what the mind adds; Add river!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.