महापालिकेच्या आपली बसमध्ये मोठया प्रमाणात तिकीट चोरी केली जाते. गेल्या महिना भरात तिकीट चोरी प्रकरणात २२ कंडक्टर बडतर्फ करण्यात आले असून ८१ कंडक्टरची आय.डी.लॉक करण्यात आल्याची माहिती परिवहन समितीचे सभापती बाल्या बोरकर यांनी दिली. ...
शहरातील फूटपाथ, रस्ते व आठवडी बाजारातील अतिक्रमणाच्या विरोधात महापालिकेने धडक मोहीम हाती घेतली आहे.ही कारवाई योग्य असल्याचा दावा सत्ताधाऱ्यांनी केला आहे. दुसरीकडे महापालिकेतील विरोधकांनी या कारवाईला विरोध दर्शविला आहे. ...
मालमत्ता कर हा महापालिकेचा मुख्य आर्थिक स्त्रोत असल्याने महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी थकबाकीदारांच्या विरोधात कठोर भूमिका घेतली आहे. थकीत कर भरा अन्यथा कारागृहात जाल असा इशारा त्यांनी दिला आहे. ...
महापालिकेच्या प्रवर्तन विभागाच्या अतिक्रमण विरोधी पथकाने सोमवारी महाल व आसीनगर झोन क्षेत्रातील सिवरलाईन व फूटपाथवरील अतिक्रमणांवर हातोडा चालविला. बडकस चौक ते गांधी पुतळा चौकापर्यंतचा मार्ग अतिक्रमणमुक्त करण्यात आला. ...
चोरीसाठी आपली बसच्या कंडक्टर व चालकांनी मोबाईलवर व्हॉट्सअॅप ‘कंडक्टर सेटअप ग्रुप’ बनविला आहे. या माध्यमातून आपली बसच्या तिकीट चेकर्सच्या लोकेशनची माहिती एकमेकांना देऊन तिकीट चोरी केली जाते. यामुळे महापालिकेला दररोज ४ ते ५ लाखांचा फटका बसत आहे. ...
नगरसेवकांना आयुक्त भेटीसाठी वेळ देत नसल्याच्या तक्रारी आहेत. ही भूमिका योग्य नाही. आयुक्तांनी त्यांना भेटीसाठी वेळ देणे आवश्यक आहे. यासंदर्भात आयुक्तांशी चर्चा करणार असल्याची माहिती महापौर संदीप जोशी यांनी शनिवारी दिली. ...
कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाच्या स्वरूपानुसार वेतन दिले जात नसल्याची तक्रार आहेत. सर्व सफाई कर्मचाऱ्यांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन द्या, असे निर्देश आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी शुक्रवारी दिले. ...
बुधवारी महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी लेखा व वित्त विभागाला आकस्मिक भेट देऊन कामकाजाची माहिती घेतली. यात अनियमितता निदर्शनास आल्याने चार कर्मचाऱ्यांना कारणे द्या नोटीस बजावण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. ...