प्रा. एन. डी. पाटील Prof. N D Patil यांचे महाराष्ट्राच्या गेल्या सत्तर वर्षाच्या सामाजिक, राजकीय जीवनातील अत्यंत धडाडीचे आणि लढाऊ नेतृत्व होते. एक झुंजार नेतृत्व अशी त्यांची ओळख होती. कामगार, शेतकरी यांचे अनेक प्रश्न त्यांनी सातत्याने मांडले होते. तसेच अनेक प्रश्न त्यांनी मार्गीही लावले होते. पहिल्यापासूनच शिक्षणाची आवड असणाऱ्या एन. डी. पाटील यांनी अर्थशास्त्र विषयातून एम.ए ची पदवी घेतली. त्यानंतर पुणे विद्यापीठातून एल.एल.बी चे शिक्षण पूर्ण केले होते. वयाच्या 93 व्या वर्षी त्यांचे 17 जानेवारी 2022 रोजी निधन झाले. Read More
प्रा. पाटील यांचे पार्थिव चितेवर ठेवून त्यामध्ये कापूर घालण्यात आला. त्यावर विस्तव ठेवण्यात आला. मंत्री पवार यांना तेवढ्याने कसा अग्नी लागणार याबद्दल उत्सुकता होती. त्याला बाहेरून भडाग्नी का देत नाही, अशी विचारणा ते तेथील कर्मचाऱ्यांना करत होते. ...
माईंचा अंत्यदर्शनावेळचा धीरोदात्तपणा आणि बहिणीच्या मागे सावली बनून राहिलेले शरद पवार असा भावा-बहिणीतील नात्याचा अनोख्या कुटुंबवत्सलतेचा पदर मंगळवारी अवघ्या महाराष्ट्राने अनुभवला आणि भाऊ असावा तर असा, असे शब्द आपसुकच बाहेर पडले. ...
माई सांगत होत्या, या घरांत माझ्या दृष्टीने तीनच गोष्टी मोलाच्या होत्या. त्यातील माझा माणूस होता, तो निघून गेला. आता राहिले काय, तर पुस्तके आणि पुरस्कार. ...
बंधू शरद पवार आले आणि माईंचा कंठ दाटून आला. बहिणीला धीर देताना पवारही भावूक झाले. काही मिनिटे दोघेही नि:शब्द झाले. या भावा-बहिणीच्या आसपास असलेल्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांनाही यावेळी गलबलून आले. ...