महापालिका प्रशासन पोलीस बळाचा वापर करुन बळजबरी शहरातील कचरा तिसगाव परिसरालगत टाकत आहे. त्यामुळे गावकर्यांनी कचर्याच्या गाड्या अडविण्यासाठी लाठ्या-काठ्या घेवून रणरागिणीसह चारही दिशेला कडा पहारा देवून येणार्या कचरा गाड्यावर पाळत ठेवली आहे. ...
गांधेलीतील नागरिकांना मनपा प्रशासनाकडून पोलीस कारवाईच्या धमक्या देण्यात आल्यामुळे मनपाच्या विरोधात ग्रामस्थांनी दोन हात करण्याची भूमिका घेत एकतेची वज्रमूठ आवळली आहे ...
सतरा दिवस झाले तरी शहरातील कचराकोंडीचा प्रश्न सुटलेला नाही. कचर्यावर प्रक्रिया करणार्या चार अत्याधुनिक मशीन युद्धपातळीवर खरेदी करण्यात येतील, अशी माहिती महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिली. ...
शासनाने विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून नारेगाव-मांडकी कचरा डेपो प्रकरणात निर्णय घेण्याचे ठरविले आहे. यासाठी एक पत्र शासनाने शासकीय अभियोक्ता आणि विभागीय आयुक्तांना पाठविले आहे. ...
शहरातील कचराकोंडी अद्याप सुटण्याची चिन्हे नसून आज १६ व्या दिवशी कांचनवाडी परिसरातील नागरिकांनी आक्रमक पवित्र घेत कचरा वाहतूक करणाऱ्या गाड्या अडवून धरल्या. ...