ऐन पावसाळ्यात खरीप पिकांसाठी पाण्याचे आवर्तन व नदीपात्रातून जायकवाडीलाही यंदा पाणी गेले़ तरी देखील यंदा पुन्हा मुळा धरण भरण्याची ऐतिहासिक घटना गेल्या ५० वर्षांत प्रथम घडत आहे़ त्यामुळे यंदा बळीराजाला चार आवर्तन मिळण्याची संधी उपलब्ध होणार आहे़ ...
‘लोकमत’ने वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्यामुळे अखेर वांबोरी चारीला पाणी सोडण्यात आले. गुरुवारी रात्री ११ वाजता तालुक्यातील लोहसर गावातील तलावात पाणी आल्याने या भागातील शेतक-यांत समाधान व्यक्त करण्यात येत आहे. ...
पुण्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्व धरणे तुडूंब भरली. त्यामुळे या धरणांमधून मुठा नदीत पाणी साेडण्यात आले. या पाण्याचे प्रमाण खडकवासला धरणाच्या अकरापट इतके हाेते. ...