मराठी कलाविश्वातील गुणी आणि अभ्यासू अभिनेत्री म्हणून मुक्ता बर्वेकडे Mukta Barve पाहिलं जातं. नाटक, मालिका आणि चित्रपटांच्या माध्यमातून मुक्ताने तिच्यातील अभिनयकौशल्य दाखवलं आहे. 'जोगवा', 'आम्ही दोघी', 'मुंबई-पुणे-मुंबई' अशा कितीतरी सुपरहिट चित्रपटांसाठी ती ओळखली जाते. 'हम तो तेरे आशिक है', 'कबड्डी कबड्डी' अशी काही नाटकंही तिची गाजली आहेत. Read More
या चित्रपटातील स्वप्नील जोशी व मुक्ता बर्वे या लोकप्रिय जोडीने रेखाटलेल्या जोडप्याच्या आयुष्यात पुढे काय घडते त्या प्रवासाची स्पष्ट कल्पना हा टीजर प्रेक्षकांना देतो. ...
‘मुंबई पुणे मुंबई’ या आठ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या चित्रपटाला मोठे यश मिळाले आणि त्यातून त्याच्या दुसऱ्या भागाची निर्मिती झाली. त्याशिवाय पहिल्या भागाची अनेक भाषांमध्ये पुनर्निर्मिती झाली. या चित्रपटाची वाहवा संपूर्ण जगातील सिनेरसिकांकडून झाली ...