सातारा जिल्ह्यात मान्सूनच्या पावसाला वेळेत प्रारंभ झाला असलातरी प्रमुख धरणात पाण्याची आवक अद्यापही सुरू झाली नाही. असे असले तरीही गतवर्षी पाऊस चांगला झाल्यामुळे प्रमुख धरणात यंदा चांगला पाणीसाठा आहे. कोयना धरणात गतवर्षीपेक्षा दहा टीएमसी साठा अधिक असू ...
उन्हाचा ताप आणि उकाड्याने घामाघूम झालेल्या मुंबईकरांना आज (शनिवारी) अखेर मान्सूनने दिलासा दिला. हवामान खात्याने मान्सून शनिवारी मुंबईत दाखल झाल्याचे जाहीर केले. ...
मुंबईसह आसपासच्या परिसरात शनिवारी दाखल झालेल्या मान्सूनने पहिल्याच दिवशी परिसराला झोडपून काढले. विशेषत: शनिवारी पहाटे दीडच्या सुमारास सुरू झालेल्या मुसळधार पावसाने शनिवारी दुपारी २ वाजेपर्यंत तडाखा कायम ठेवला. ...
नैर्ऋत्य मोसमी पावसाने शनिवारी जोरदार वाटचाल करीत अर्धा महाराष्ट्र व्यापला असून कोकण, गोव्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली़ मराठवाड्यातही धुवांधार पाऊस झाला. ...
वाशिम - गत २४ तासांत ९ जून रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी ७३ मीमी पाऊस झाल्याची नोंद असून, सर्वाधिक ११२ मीमी पाऊस मंगरूळपीर तालुक्यात तर सर्वात कमी २५ मीमी पाऊस मानोरा तालुक्यात पडला. ...
माण तालुक्यातील अनेक गावांत शुक्रवारी सायंकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. कुळकजाई, गाडेवाडी, कळसकरवाडी, शिंदी, भांडवली, मलवडी, आंधळी या गावांना पावसाचा तडाखा बसला असून तेथे तब्बल ६० मिलीमीटर पाऊस पडला. तर गाडेवाडी येथील १७ बंधारे पाण्याखाली गेले. ...
वरुणराजाने दुष्काळी भागावर वरदहस्त दाखविला आहे. दुष्काळी भागातील प्रमुख गावांमध्ये शुक्रवार, दि. 0८ रोजी सकाळी ७ ते ते शनिवार, दि. ९ सकाळी ७ वाजेपर्यंतच्या कालावधीत जिल्ह्यामध्ये एकूण २३४.७ मिलिमीटर पाऊस झाला. पावसाच्या धमाक्यामुळे दुष्काळी भागातील ब ...