पिकुळे-दोडामार्ग रस्त्यावरील झरेबांबर-गावठणवाडी येथील पुलाला भगदाड पडल्याचे उघडकीस आले. या पुलाच्या डागडुजीची वारंवार मागणी करूनही बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याने हा पूल कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...
मूर्तिजापूर - मूर्तिजापूर तालुक्यात गत तीन दिवसापासुन सुरु असलेला संततधार पाऊस थांबता थांबत नसुन, आज तालुक्यातील काही भागात अतिवृष्टी झाल्याने राजनापूर खिनखीनी, कुरुम, कवठा, मंडूरा, रामटेक, कासारखेड, कार्ली, माना आकोली, सैदापुर, नवसाळ ही गावे पाण्या ...
सातारा जिल्ह्यातील धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून, बुधवारी सकाळपर्यंत कोयनेमध्ये जवळपास ५० टीएमसी इतका साठा झाला होता. तर जिल्ह्यातील इतर धरणातही पाण्याची आवक वाढल्याने मोठ्या प्रमाणात साठा झाला आहे. ...
वाशिम: गतवर्षी वाशिम जिल्ह्यावर रुसलेला वरूण राजा यंदा मात्र चांगलाच बरसत आहे. जिल्ह्यात यंदा मान्सूनला सुरुवात झाल्यापासून अवघ्या महिनाभरातच वार्षिक सरासरीच्या ४६ टक्के पावसाची नोंद झाली आहे. ...
कोल्हापूर शहरात मंगळवारी पावसाचा जोर कमी असला तरी दिवसभर रिपरिप सुरू राहिली. मात्र, जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असल्याने २७ बंधारे पाण्याखाली गेले असून, या मार्गांवरील वाहतूक अंशत: अन्य मार्गांवरून वळविण्यात आली. गगनबावड्यात अतिवृष्टी सुरूच असून चंदगड ...
सुकळवाड सावंतवाडा येथील लवू सावंत (४०) या तरुणास ओहोळातील तुडुंब पाण्यात वाहत असताना तेथील ललित पाताडे या धाडसी युवकाने आपल्या सहकारी मित्रांसोबत पुरातून बाहेर काढून जीवदान दिले. त्यांच्या या धैर्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. ...
रत्नागिरीतील रत्नदुर्ग माऊंटेनिअर्सच्या सदस्यांनी जीवाचे रान केले आणि राजापूर तालुक्यातील चुनाकोळवण येथील सवतकडा धबधब्यामध्ये अडकलेल्या १३ पर्यटकांना जीवदान दिले. दोन वाजता सुरू झालेली ही मोहीम तब्बल तीन तासांनी फत्ते झाली. ...