अनेक दिवसांनंतर कोयना धरण परिसरात पावसाने चांगली हजेरी लावली असून २४ तासांत ३५ मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर धरणात १०२ टीएमसी साठा असून पायथा वीजगृहातून १०५० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दुसरीकडे धोम आणि उरमोडी धरणात पाण्याची आवक बंद झाली आहे. ...
पावसाने खंड दिल्याने तोंडाशी आलेले सोयाबीन तसेच मूग आणि उडीदाचे मोठे नुकसान झाले आहे. या सुकलेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आ. सुरेशकुमार जेथलिया यांनी केली आहे. ...
जिल्ह्यात यंदा जवळपास ४८ हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी करण्यात आली आहे. गेल्या वीस दिवसांपासून पावसाने खंड दिल्याने ऐन शेंगा लागण्याच्या काळात सोयाबीनने माना टाकल्या आहेत. ...
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात असणाऱ्या प्रमुख व मोठ्या धरणांतून नदीपात्रात होणारा विसर्ग बंद करण्यात आला आहे. तर सध्या उरमोडी आणि धोम या धरणातून सिंचनासाठी पाणी सोडण्यात येत आहे. दरम्यान, पूर्व भागात पावसाने कायम पाठ फिरविली आहे. ...
कोयना परिसरात तीन दिवसांपासून पावसाने उघडीप दिली असून, धरणात पाण्याची आवक कमी होत आहे. सध्या धरणात १०३.८ टीएमसी इतका साठा आहे. तर महाबळेश्वर येथे बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत पावसाची कसलीही नोंद झालेली नाही. ...