गेले आठ-दहा दिवस अवजड वाहनांसाठी बंद केलेला शिवाजी पूल बुधवारी दुपारी अखेर वहातूकीसाठी खुला करण्यात आला. पावसाचा जोर कमी झाल्याने पुराचे पाणी ओसरू लागल्याने जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. पाऊस कमी झाला असला तरी जिल्ह्यातील २७ बंधारे पाण्याखाल ...
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कमी होत असल्याने कोयना धरणाचे दरवाजे मंगळवारी सकाळी दीड फुटाने कमी करुन साडे पाच फुटांवर ठेवण्यात आले. त्यामुळे विसर्ग कमी झाला आहे. सध्या सहा दरवाजे आणि पायथा वीजगृहातून २५७०७ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू ...
कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. सोमवारीही उघडझाप राहून काही काळ शहरासह जिल्ह्यात खडखडीत ऊनही पडले. जिल्ह्यातील नद्या अजून तुडूंब भरल्या असल्याने अद्याप ५७ बंधारे पाण्याखाली आहेत. ...
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कमी झाला असून, कोयनेची पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी धरणाचे दरवाजे सोमवारी सकाळी पुन्हा एक फुटाने उचलून सात फुटांवर नेण्यात आले आहेत. ...
धामोड धरण बांधणीच्या इतिहासात ३४ वर्षात प्रथमताच जुलै महिन्यात तुळशी धरण भरल्याची नोंद झाली आहे. या वर्षी गेल्या पंधरा दिवसापासून पावसाची संततधार सुरू राहिल्याने धरणाने एक वेगळा विक्रम नोंदवला. ...
वारणा व कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू आहे. पाटबंधारे विभाग, महसूल, पोलीस हे सर्व विभाग समन्वयाने काम करत आहेत. जिल्ह्यात सद्यस्थितीत कोणत्याही प्रकारच्या काळजीचे कारण नाही. जिल्ह्यात स्थिती नियंत्रणात आहे, असे प्रतिपादन जिल्हाध ...