दिल्ली येथूनही नागपुरात आलेल्या प्रवाशांना विलगीकरण कक्षात दाखल केले जात आहे. गुरुवारी सायंकाळपर्यंत आमदार निवास, वनामती व रविभवनात ११७ प्रवाशांना दाखल करण्यात आले. सध्याच्या स्थिती आमदार निवास व वनामती प्रवाशांनी फुल्ल झाले आहे. ...
दिल्ली येथील निजामुद्दीनच्या तबलिग जमात मकरजमध्ये सहभागी झालेल्यांमध्ये नागपुरातील सुमारे ७० जणांचा समावेश होता, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. यापैकी ५४ जणांचा शोध लागला असून, त्यांना आमदार निवास येथे ‘क्वारंटाईन’ करण्यात आले आहे. ...
आमदार निवासातील चेहरा सध्या बदललेला दिसून येत आहे. इमारत क्रमांक २ कडक सुरक्षा व्यवस्थेत आहे. येथे कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने विदेशातून आलेल्या लोकांचे विलगीकरण कक्ष (क्वॉरंटाईन) ची व्यवस्था करण्यात आली आहे. ...
आमदार निवास येथे २१० खोल्यांमध्ये सुमारे साडेचारशे व्यक्ती राहू शकतील अशी सुविधा करण्यात आली असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी दिली. ...