कोरोना विषाणूपासून गर्दीव्दारे संसर्ग होऊ नये याकरीता उपविभागीय दंडाधिकारी मिरज समीर शिंगटे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1)(3) अन्वये जमावबंदी आदेश जारी केला आहे. ...
कोरोना साथीमुळे जिल्ह्यातील जत्रा-यात्रा आणि अन्य सार्वजनिक कार्यक्रम संकटात सापडले आहेत. मिरजेच्या उरूसासह गर्दीचे सर्व कार्यक्रम स्थगित ठेवण्याचे किंवा पुढे ढकलण्याची सूचना जिल्हा प्रशासनाने केली आहे. महिला दिनानिमित्त ८ मार्चला मोठ्या प्रमाणात कार ...
मिरजेतील १३ कोटी खर्चाची भाजी मंडई उभारणीसाठी ठेकेदाराने काम सुरू केले आहे. मात्र खंदकातील भाजी मंडईकडे जाण्यासाठी रस्ताच नसल्याने, काम थांबविण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्याने भाजी मंडईचे काम आणखी रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...
मिरजेत गांधी चौक ते बसस्थानक या शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांमुळे अपघातात दुचाकीस्वाराचा बळी गेला. स्टेशन चौकात ड्रेनेज यंत्रणा खचल्याने लावलेल्या बॅरिकेटस्ला दुचाकी धडकून निवृत्त रेल्वे तिकीट तपासनीस पी. बी. ऊर्फ पायण्णा बाबूराव ...
विधानसभा निवडणुकीसाठी बिल्ले, झेंडे, टोप्या, उमेदवार व समर्थकांसाठी पाठीवर लावता येणारे एलईडी डिस्प्ले अशी हायटेक प्रचार साधने उपलब्ध झाली आहेत. जीएसटी व प्लास्टिक बंदीमुळे प्रचार साहित्याची दरवाढ झाली असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. ...
गाईच्या दुधास बोनस देण्यास नकार देणाऱ्या गोकुळ दूध संघासमोर गुरुवारी मिरजेमधील दूध उत्पादकांनी एकत्र जमून संताप व्यक्त केला. संघाचे चेअरमन रवींद्र आपटे यांनी संघाला परवडत नसल्यानेच हा निर्णय घेतला आहे; तथापि आपल्या भावना २२ आॅक्टोबरला होणाऱ्या संचालक ...
सांगली व मिरज या दोन मतदारसंघात पक्षांतर्गत गटबाजीमुळे काही नगरसेवकांचे तळ्यात-मळ्यात सुरू आहे, तर काहींनी छुपी भूमिका घेण्याचे संकेत दिले आहेत. प्रचाराचा ज्वर चढल्यानंतर नगरसेवकांची भूमिका आणखी स्पष्ट होईल. ...