ऐक्याचे दर्शन; दर्ग्याजवळ येताच गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केली 'अशी' कृती, व्हिडिओ व्हायरल

By अविनाश कोळी | Published: September 2, 2022 01:41 PM2022-09-02T13:41:53+5:302022-09-02T14:30:08+5:30

सांगली : मिरजेतील मिरासाहेब दर्गा संपूर्ण देशभर प्रसिद्ध आहे. हिंदू -मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणूनही त्याकडे पाहिले जाते. मिरजेत गणेशोत्सावाला ...

As soon as they approached the dargya the workers of Ganesh Mandal put up kawali, video viral Incident in Miraj | ऐक्याचे दर्शन; दर्ग्याजवळ येताच गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केली 'अशी' कृती, व्हिडिओ व्हायरल

ऐक्याचे दर्शन; दर्ग्याजवळ येताच गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केली 'अशी' कृती, व्हिडिओ व्हायरल

Next

सांगली : मिरजेतील मिरासाहेब दर्गा संपूर्ण देशभर प्रसिद्ध आहे. हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणूनही त्याकडे पाहिले जाते. मिरजेत गणेशोत्सावाला मोठी परंपरा आहे. येथील सर्वोदय गणेश मंडळाची गणपती मिरवणूक दर्ग्याजवळ आल्यानंतर अशी कृती केली की तिचा व्हिडिओ सर्वत्र मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला.

सर्वोदय गणेशोत्सव मंडळ हे मिरजेतील मोठे मंडळ आहे. मिरासाहेब दर्गा येथे मंडळाच्या बाप्पाचे आगमन झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी कवाली वाजवली. 'भर दो झोली मेरी या मुहम्मद लौट कर मैं ना जाऊँगा खाली' ही कवाली स्पिकरवर लावून टाळ्या वाजवत वंदन केले. मंडळाने कवाली वाजवून 'हिंदू-मुस्लिम भाई भाई' हा संदेश दिला आहे. हिंदू मुस्लिम या दोन समाजांतील ऐक्याचा पायंडा या मंडळाने घालून दिला आहे.

त्यांनतर मिरासाहेब दर्गा कमिटी खादीम समाजाने सर्वोदय मंडळाच्या बाप्पाला पुष्पहार अर्पण केला आणि यामध्ये हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडले. तसेच खादीम समाजाचे मिरासाहेब दर्गा पुजारी हुसेन मुत्तवली यांनी अशीच पंरपरा कायम ठेवू आणि सर्वोदय मंडळाने ही परंपरा कायम ठेवल्यामुळे त्यांचे आभार मानले. यावेळी शफीक मुश्रीफ, हुसेन मुत्तवली, शरफराज मुश्रीफ, आवेज मुश्रीफ, जानिफ मुश्रीफ, अजगर शरीफ मसलत दर्गा खादीम पुजारी उपस्थित होते.


Web Title: As soon as they approached the dargya the workers of Ganesh Mandal put up kawali, video viral Incident in Miraj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.