आकोट/ पोपटखेड: मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून अकोट तालुक्यात पुनर्वसित झालेल्या आठ गावातील ग्रामस्थांनी पुन्हा मेळघाटकडे आगेकूच केली आहे. उपवनसंरक्षक कार्यालयात निवेदन देऊन गावकऱ्यांनी पोपटखेड गेट पार करून जंगलात प्रवेश केला आहे. ...
अमरावती - मुंबई अंबा एक्सप्रेसच्या दोन एसी कोचवर मेळघाट रेखाटला जाणार आहे. त्यात मेळघाटातील वन व वन्यजीव आणि नैसर्गिक सौंदर्य प्रवाशांना बघावयास मिळणार आहे. ...
मेळघाटात एक नव्हे तर अनेक वाघांची शिकार केल्या गेली असून, यात वाघासह बिबट्यांचाही समावेश आहे. या शिकारी २०१३-१४ पासून घडत आल्या असल्या तरी अगदी काही दिवसांपूर्वीही वाघ मारले गेले आहेत. ...
आदिवासी बांधवांनी गुरुवार ६ डिसेंबर रोजी अकोट येथून अकोल्याच्या दिशेने कुच केली. शुक्रवार, ७ डिसेंबर रोजी आदीवासींचा हा लाँगमार्च अकोला शहरात दाखल झाला असून, जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. ...
दारिद्र्य, कुपोषण आणि मागास भागाचा शिक्का असलेल्या मेळघाटातील आदिवासीबहुल राहू या छोट्याशा गावातील गोकुल राघो येवले या युवकाने आशियाई स्पर्धेत दोन सुवर्णपदकांची कमाई केली. त्याच्या या कामगिरीने सर्वांना अचंबित केले आहे. ...