मायावती या उत्तर प्रदेशमधल्या प्रभावी नेत्या आणि राजकारणी आहेत. तसेच त्यांनी उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रिपदही भूषवलं आहे. बहुजन समाज पार्टी या पक्षाला इ.स. 2007 सालातील निवडणुकीमध्ये त्यांनी बहुमत मिळवून उत्तर प्रदेशात दलित नेतृत्वाचे एक नवे समीकरण निर्माण केले आणि त्यांनी उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रिपद भूषवलं होतं. मायावती बहेनजी आणि कुमारी मायावती या नावांनी सुद्धा संबोधल्या जातात. Read More
Gyanvapi Masjid Case : लोकांच्या धार्मिक भावना भडकावण्याचे हे सुनियोजित कारस्थान असल्याचे मायावती म्हणाल्या. यासोबतच त्यांनी जनतेला बंधुभाव जपण्याचे आवाहनही केले आहे. ...
Uttar Pradesh Politics: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीनंतर आता सपा अध्यक्ष अखिलेश यादव आणि बसपा सुप्रीमो मायावती देशाच्या राष्ट्रपतीपदावरुन आमनेसामने आले आहेत. ...
Mayawati : पुन्हा एकदा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री किंवा पुढील पंतप्रधान होण्याचे स्वप्न पाहू शकते, परंतु राष्ट्रपती होण्याचे स्वप्न कधीच पाहणार नाही, असे म्हणत मायावती यांनी अखिलेश यादव यांना प्रत्युत्तर दिले आहे. ...
"काँग्रेस सुरुवातीपासूनच घाणेरडे राजकारण करते. मी उत्तर दिले नाही, असे राहुल गांधी यांचे म्हणणे आहे, हे चुकीचे आहे. यात कसल्याही प्रकारचे तथ्य नाही." ...
Rahul Gandhi News: केवळ ईडी व सीबीआय कारवाईच्या भीतीमुळे बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांनी काँग्रेसने आघाडीसाठी दिलेल्या प्रस्तावावर कोणताही प्रतिसाद दिला नाही, असा गौप्यस्फोट काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शनिवारी केला. ...
बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख आणि युपीच्या मुख्यमंत्री मायावती यांनीही भाजपावर निशाणा साधला आहे. तसेच, नवाब मलिक यांच्या अटकेचं कनेक्शन युपीतील निवडणुका असल्याचंही त्यांनी म्हटलंय. ...