मायावती या उत्तर प्रदेशमधल्या प्रभावी नेत्या आणि राजकारणी आहेत. तसेच त्यांनी उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रिपदही भूषवलं आहे. बहुजन समाज पार्टी या पक्षाला इ.स. 2007 सालातील निवडणुकीमध्ये त्यांनी बहुमत मिळवून उत्तर प्रदेशात दलित नेतृत्वाचे एक नवे समीकरण निर्माण केले आणि त्यांनी उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रिपद भूषवलं होतं. मायावती बहेनजी आणि कुमारी मायावती या नावांनी सुद्धा संबोधल्या जातात. Read More
ज्या ठिकाणी प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती, तिथे मायावतींचे एक बॅनर लावण्यात आले होते. बॅनरवर मायावती यांच्या नावासमोर पंतप्रधान लिहिलेले होते. त्यावर मायावती म्हणाल्या की, नमो-नमो वाल्यांची सुट्टी होणार असून जय भीम वाले येणार आहेत. ...
उत्तर प्रदेशमधील अमेठी येथे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी व रायबरेलीमध्ये यूपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधी लोकसभा निवडणूक लढवत असून त्यांना मतदान करण्याचा आदेश बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी आपल्या पक्षकार्यकर्त्यांना रविवारी दिला. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अर्धवट राहिलेली कामे पूर्ण करण्यासाठी बहुजन समाजपक्षाची निर्मिती झाली आहे. भाजपने देखील काँग्रेसप्रमाणे नकली आंबेडकरवादी होण्याची उठाठेव सुरू केली आहे. ही उठाठेव भाजपने करू नये, असा सल्ला मायवती यांनी दिला. ...